पुणे

पुणे शहरात सोमवारपासून ‘सक्षम पंधरवडा’

CD

पुणे, ता. २१ ः पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या पुढाकाराने पुणे शहरात येत्या सोमवारपासून (ता. २४) ऊर्जेची बचत, शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी सक्षम पंधरवड्याचे (संरक्षण क्षमता महोत्सव) आयोजन केले आहे. हा पंधरवडा २४ एप्रिल ते ८ मे २०२३ या कालावधीत ‘नेट झिरो’ या संकल्पनेवर आधारित साजरा केला जाणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या पंधरवड्याचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे.
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एचपीसीएल) पुणे विभागाचे विपणन अधिकारी गौरव अग्रवाल यांनी शुक्रवारी (ता. २१) पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. यावेळी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पुणे विभागाचे विपणन अधिकारी यशपाल चौकी, मनुष्यबळ अधिकारी घनश्याम गायकवाड, पेट्रोल व डिझेल डीलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला आदी उपस्थित होते.
या पंधरवड्यात तेल कंपन्यांनी आयोजित केलेल्या रांगोळी आणि तेल संवर्धनावर विद्यार्थ्यांनी केलेली लघुनाटिका पाहता येणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी समूह संभाषण, वादविवाद, महाविद्यालयांमध्ये भित्तिचित्रे स्पर्धा, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, लेख लेखन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. रेडिओवरून जनजागृतीसाठी जिंगल्स प्रसारित केल्या जातील. धन आणि तेल संवर्धनासाठी शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांचा त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सत्कार करण्यात येणार असल्याचे चौकी यांनी सांगितले.
अग्रवाल म्हणाले, ‘‘जीवाश्म इंधनावरील खर्चाला आळा घालणे, परकीय तिजोरीवरील वाढते ओझे कमी करणे आणि जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे निर्माण झालेल्या हरितगृह वायूच्या प्रतिकूल परिणामांपासून पर्यावरणाचे रक्षण करणे, हे या कार्यक्रमाचे अंतिम लक्ष्य आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT