पुणे

यार्ड रिमॉडेलिंगला मुहूर्त मिळेना!

CD

पुणे, ता. २२ ः पुणे रेल्वे स्थानकाच्या ‘यार्ड रिमॉडेलिंग’च्या कामास वारंवार खो मिळत असल्याने याचा थेट परिणाम प्रवासी सेवेवर होत आहे. रेल्वेच्या बोट चेपी धोरणामुळे अजूनही यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाचा श्रीगणेशा झालेला नाही. आता रेल्वे प्रशासन कन्स्ट्रक्शन (बांधकाम) विभागाला वेळ नसल्याने हे काम पावसाळ्यानंतर सुरू होईल असे सांगण्यात आले. मात्र, कन्स्ट्रक्शन विभागाला वेळ नसेल तर हे काम ‘गती शक्ती युनिट’ ला देण्यात यावे, अशी मागणी झोनल रेल्वे सल्लागार समिती सदस्यांनी केली आहे.

पुणे रेल्वे स्थानकाच्या ‘यार्ड रिमॉडेलिंग’चा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. यात डीआरएम व जीएम बदलून गेले. नव्याने पदभार स्वीकारून सहा महिने लोटले. तरी ‘यार्ड रिमॉडेलिंग’च्या कामांना सुरुवात होत नाही. डीसीएन (विभागीय परिपत्रक सूचना) तयार झाला. मात्र, दर महिन्याला खो दिला जातो. अन् पुन्हा नव्याने अंदाज व्यक्त केला जातो. आता रेल्वेच्या बांधकाम विभागाने पुणे-मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या कामांना प्राधान्य देत असल्याने यार्डचे काम पावसाळ्यानंतरच सुरू होणार, असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.

...तर गती शक्तीची मदत घ्यावी
विभाग स्तरांवर रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने गती शक्ती युनिटची स्थापना केली. यार्ड रिमॉडेलिंगचे काम बांधकाम विभाग करणार आहे. मात्र, त्यांना वेळ नाही. गती शक्ती युनिटकडे स्वतंत्र यंत्रणा आहे. या कामासाठी पूर्वीच निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे निधीचाही प्रश्न राहिला नाही. तेव्हा गती शक्ती युनिटला हे काम दिल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल.

पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी यार्ड रिमॉडेलिंगचे काम होणे गरजेचे आहे. जर बांधकाम विभागला वेळ नसेल तर गती शक्ती युनिटने हे काम करावे. केवळ वेळ नाही, म्हणून जर दिरंगाई होत असेल तर हे चुकीचे आहे. प्रवाशांना वेठीस धरणे चुकीचे आहे.
शिवनाथ बियाणी, झोनल रेल्वे सल्लागार समिती सदस्य, पुणे

पुणे -मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामामुळे यार्ड रिमॉडेलिंगच्या कामास विलंब होत आहे. पावसाळ्यानंतरच हे काम सुरू होण्याची शक्यता आहे. बांधकाम विभागाने दुहेरीकरणाच्या कामास प्राधान्य दिले आहे.
- इंदुराणी दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT