पुणे

ग्राहकांनी साधला ‘सोनेरी’ मुहूर्त

CD

पुणे, ता. २२ ः साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षाच्या तुलनेत भावात २० टक्के वाढ असतानाही नागरिकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केली होती.

ग्राहकांनी पेठांमध्ये शनिवार आणि त्याचबरोबर सार्वजनिक सुटीमुळे सकाळपासूनच सोने खरेदीसाठी गर्दी केली होती. वर्षभर खरेदीचा आनंद अक्षय्य राहावा म्हणून मुहुर्त साधणाऱ्या पुणेकरांनी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ५ टक्के अधिक सोने खरेदी केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मागील वर्षी अक्षय्य तृतीयेला ५० हजार ८०० रूपयांवर असलेले सोने यंदा ६१ हजार रूपये प्रति तोळ्यावर येऊन पोचले आहे.

विशेष करून लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या मारुती चौकातील सराफ बाजार गजबजून गेला होता. सराफ व्यावसायिकांनी जाहीर केलेल्या विविध आकर्षक सवलतींचा लाभ नागरिकांनी घेतला.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्याचे भाव जवळपास २० टक्क्यांनी वाढले होते. परंतु, चांगल्या मुहुर्तावरील खरेदीसाठी ग्राहकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. कमी वजनाच्या दागिन्यांसह नैसर्गिक हिरे, १८ आणि २४ कॅरेटच्या दागिन्यांना विशेष मागणी होती. पाच वर्षांत जवळपास दुप्पट परतावा देणाऱ्या सोन्याकडे नागरिक सुरक्षित गुतंवणूक म्हणून पाहत आहे.
- अमित मोडक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएन गाडगीळ ॲन्ड सन्स

सकाळपासून राज्यभरातील आमच्या दालनात खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. लग्नासाठी लागणारे दागिने, हिऱ्याचे दागिने, हलक्या वजनाचे दागिने व चांदीच्या दागिन्यांना ग्राहकांची पसंती मिळाली. दागिन्यांच्या विक्री प्रमाणाचा विचार करता गेल्या वर्षी पेक्षा यावर्षी १५ टक्के तर मूल्याचा विचार करता सुमारे ४० टक्के वाढ दिसून आली आहे. गेल्या वर्षी या दिवशी देशभरात अक्षय्य तृतीयाला साधारण २८ टन दागिने खरेदी झाली होती, यावर्षी हा आकडा ३५ टनपर्यंत जाईल असा अंदाज आहे.
- डॉ. सौरभ गाडगीळ, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पीएनजी ज्वेलर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT