पुणे

गावात भूजल वाढवा, ५० लाखांचे बक्षीस मिळवा

CD

पुणे, ता. २२ ः लोकसहभागातून गावातील घटलेली भूजल पातळी वाढविण्यासाठी दोन वर्ष भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा जाहीर केली आहे. ही स्पर्धा केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजनेत समाविष्ट गावांपुरती मर्यादित आहे. यात राज्यातील १३ जिल्ह्यांमधील एक हजार ४४२ गावांना सहभाग घेता येईल. या स्पर्धेत जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रत्येकी पहिल्या तीन गावांना पुरस्कार दिले जातील. जिल्ह्यात प्रथम आलेल्या गावांना प्रत्येकी ५० लाखांचे तर, राज्यात अव्वल ठरलेल्या गावास एक कोटी रुपयांचे प्रथम पारितोषिक दिले जाणार आहे. यात सहभागासाठी गावांनी मंगळवारपर्यंत (ता. २५) प्रस्ताव पाठविणे आवश्‍यक आहे.

केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजनेत पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा व सोलापूर या चार जिल्ह्यांसह नाशिक, नगर व जळगाव, नागपूर, अमरावती, बुलडाणा, जालना, लातूर आणि उस्मानाबाद या १३ जिल्ह्यांचा समावेश असल्याचे राज्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी सांगितले. अटल भूजल योजनेत पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, पुरंदर या तीन तालुक्यांमधील १०५ ग्रामपंचायतींमधील ११८ गावांचा समावेश असल्याचे पुणे जिल्ह्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक संतोष गावडे यांनी सांगितले.
जमिनीतील पाण्याचा बेसुमार उपसा झाल्यामुळे देशातील हजारो गावांमधील भूजल पातळी कमी झाली आहे. विंधनविहिरींची खोदाई हे यामागचे प्रमुख कारण आहे. अशा गावांमधील भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने २०२० पासून अटल भूजल योजना सुरु केली आहे. ही पुरस्कार योजना २०२२-२३ आणि २०२३-२४ या दोनच आर्थिक वर्षांपुरती मर्यादित आहे. या योजनेत जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या गावांना प्रत्येकी ५० लाख, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या गावांना ३० लाख आणि तृतीय क्रमांकास २० लाख रुपयांचे आणि राज्यात अव्वल ठरणाऱ्या गावास एक कोटी, द्वितीय क्रमांकास ५० लाख आणि तृतीय क्रमांकाच्या गावास ३० लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय या सर्व गावांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

दोन वर्षात ८४ गावांना पुरस्कार देणार
या स्पर्धेतून प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यातून गुणानुक्रमे पहिले तीन असे राज्यातील १३ जिल्ह्यांमधून ३९ पुरस्कार आणि राज्यस्तरीय तीन असे एका वर्षात ४२ गावांना पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या वर्षीही तेवढीच गावे पुरस्कारासाठी निवडणार आहेत. यानुसार दोन वर्षांत राज्यातील ८४ गावांचा भूजल समृद्ध ग्राम पुरस्काराने गौरव करणार असल्याचे चिंतामणी जोशी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबईत वन्यप्राण्यांची तस्करी उघड? जुहूत घरातून जिवंत मगरीसह कासव जप्त; २९ वर्षीय इम्रान शेख पोलिसांच्या ताब्यात

Viral Video: हायवेवर थरारक स्टंट करत होती ताई, पण क्षणात घडले असं काही की व्हिडिओ पाहून धक्का बसेल

Kolhapur Mayor Results : कोल्हापुरात महायुतीचा दबदबा! महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम, तर उपमहापौरपदी अक्षय जरग यांची बाजी; काँग्रेसचा पराभव

चार दिवसांत पत्नी गर्भवती कशी राहू शकते? आर्मीत असलेल्या पतीची थेट हायकोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

Canada Work Permit Rules: कॅनडामध्ये नोकरी करायची आहे? मग 'ही' चूक करू नका, नाहीतर देश सोडावा लागेल...

SCROLL FOR NEXT