पुणे

महापालिकेकडून ७० लाख लिटर पाण्याची बचत

CD

पुणे, ता. २८ : शहरातील वॉशिंग सेंटरवर वाहने धुण्यासाठी वापरले जाणारे पिण्याचे पाणी, बांधकाम प्रकल्पासह विविध प्रकल्प, उद्याने अशा विविध ठिकाणी होणारा पिण्याच्या पाण्याचा वापर थांबविण्याकडे लक्ष दिले जात आहे. जुन्या जलवाहिन्या बदलण्यासह पाणीगळतीच्या ठिकाणी दुरुस्ती करून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दीड महिन्यात एका दिवसात ५० हजार लोकांना पुरेल इतक्‍या ७० लाख लिटर (७ एमएल) पाण्याची बचत करण्यात यश मिळाले आहे. एकीकडे महापालिका स्वतः पाणी बचतीकडे लक्ष देत असतानाच दुसरीकडे नागरिकांनीही पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळत पाणी बचतीला प्राधान्य देण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
उन्हाळ्याची तीव्रता जसजशी वाढू लागते त्याप्रमाणे शहरात पाण्याच्या मागणीतही वाढ होते. मात्र यंदा ‘एल निनो’मुळे पावसावर होणारा परिणाम लक्षात घेऊन पावसाचे गणित बिघडण्याची स्थिती असल्याचे हवामान खात्याने यापूर्वीच वर्तविले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये पुरेसा पाणी पुरवठा असला, तरीही पाण्याचे बाष्पीभवन व शेतीसाठीचे आवर्तन अशा कारणांमुळे किमान दीड ते दोन टीएमसी पाणी कमी होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर शहराला पावसाळ्यापर्यंत पाणी पुरविता यावे, यासाठी महापालिकेने पाणी बचतीवर आता लक्ष केंद्रित केले आहे.

महापालिकेकडून वॉशिंग सेंटर, बांधकाम प्रकल्प, विविध प्रकारचे विकासकामे, प्रकल्प, उद्याने यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळण्यात यावा, यादृष्टीने त्यांना सूचना देण्यावर भर दिला जात आहे. जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. याबरोबरच पाणी गळती होणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन अत्याधुनिक पद्धतीने गळती थांबविण्यात येत आहे. महापालिकेकडून ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’वर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सोसायट्यांवर ‘करडी नजर’
अनेकदा सोसायट्या, विविध प्रकारच्या आस्थापना, शाळा, महाविद्यालये, सरकारी, खासगी कार्यालये यांच्याकडील पाण्याच्या टाक्‍या भरून वाहतानाचे चित्र दिसून येते. असे चित्र आढळल्यास नागरीकांनी त्वरित महापालिकेला त्याची खबर द्यावी. तसेच अत्यल्प खर्च करून ‘बॉल कॉक’ बसविल्यास टाकी भरल्यानंतर पाणी वाहणार नाही. त्यामुळेही पाण्याची बचत होईल.

पाण्याचा पुनर्वापर करा
सोसायट्यांच्या ‘सिवेज ट्रिटमेंट प्लांट’च्या पाण्याचा विविध ठिकाणी वापर करणे शक्‍य आहे. त्यामुळे देखील पिण्यायोग्य पाण्याची चांगल्या पद्धतीने बचत करता येऊ शकते. काही सिवेज ट्रीटमेंट प्लांट बंद पडले असतील, तर ते संबंधित सोसायटीने पुन्हा सुरु करावेत, असे आवाहनही पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन नागरीकांनी आपल्याला आवश्‍यकतेनुसार पाण्याचा वापर करावा. तसेच पाण्याची बचत करतानाच रेन वॉटर हार्वेस्टींग, सिवेज ट्रीटमेंट प्लांट अशा पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा. टाक्‍यांमधील पाणी वाया जात असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारीही त्यावर लक्ष देतील.
अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग, पुणे महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT