पुणे

लवकरच १९ हजार कर्मचाऱ्यांची भरती राज्याच्या ग्रामविकास विभागाचे संकेत; येत्या दोन आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होणार

CD

पुणे, ता. २८ ः राज्यातील जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची मागील दहा वर्षांपासून रखडलेली कर्मचारी भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचे संकेत राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिले आहेत.

कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी या खात्याने विविध सहा राज्यस्तरीय समित्यांची स्थापना केली आहे. या समित्यांमध्ये ग्रामविकास खात्यातील उच्चशिक्षित आणि अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश केला आहे. या अधिकाऱ्यांची दोन दिवशीय कार्यशाळा पुण्यात होणार असून, ही कार्यशाळा शुक्रवारी (ता.२८) सुरू झाली आहे. सर्व जिल्हा परिषदांमधील मिळून १८ हजार ९३९ रिक्त जागांची भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात येत्या दोन आठवड्यात प्रसिद्ध करण्याचा निश्‍चय ग्रामविकास विभागाने केला आहे.

जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांची २०१६ पासून आतापर्यंत एकदाही भरती झालेली नाही. पूर्वी ही प्रक्रिया दरवर्षी जुलै महिन्यात सुरू केली जात असे. दरम्यान, ‘क’ वर्गीय रिक्त पदांची भरती करण्यासाठी राज्य सरकारने महाभरती अंतर्गत मार्च २०१९ आणि आॅगस्ट २०२१ अशी दोन वेळा भरती प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, या दोन्ही भरती प्रक्रिया राज्याच्या ग्रामविकास विभागाने आक्टोबर २०२२ मध्ये रद्द केल्या होत्या. शिवाय या दोन्ही भरती प्रक्रियेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णयही घेतला.

दरम्यान, जिल्हा परिषदांमधील ‘क’ वर्ग संवर्गातील रिक्त पदांचा सुधारित आकृतिबंध तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. हा सुधारित आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर नव्याने या रिक्त पदांच्या भरतीसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते. यानुसार सुधारित आकृतिबंध मंजूर करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. या समितीने त्यांचा अहवाल डिसेंबर २०२२ लाच राज्य सरकारकडे सादर केला आहे. या समितीने ११ फेब्रुवारी २०१६ च्या ग्रामविकास विभागाच्या अध्यादेशातील तरतुदींचा अभ्यास करून, जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतिबंध तयार केला आहे.

जिल्हा परिषद पातळीवरच भरती होणार

जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्वी जिल्हा परिषद पातळीवरच केली जात असे. राज्य सरकारने मध्यंतरी ही भरती प्रक्रिया राज्यस्तरीय केली होती. त्यामुळे जिल्हा परिषदांचा कर्मचारी भरतीचा अधिकार संपुष्टात आला होता. परंतु, आता पूर्वीप्रमाणे पुन्हा जिल्हा परिषद पातळीवरच ही कर्मचारी भरती केली जाणार आहे.

पुणे झेडपीत ८९९ जागांची भरती
या भरती प्रक्रियेत पुणे जिल्हा परिषदेतील ८९९ रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, विस्तार अधिकारी आदी विविध संवर्गातील पदांचा समावेश आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

भरतीसाठीच्या परीक्षांच्या विविध अभ्यासक्रम समित्या

- आरोग्य भरती तांत्रिक अभ्यासक्रम समिती
- बांधकाम विभाग भरती समिती
- कनिष्ठ, वरिष्ठ सहायक भरती समिती
- विस्तार अधिकारी भरती समिती
- आरोग्यसेवक भरती समिती
- अभ्यासक्रम तपासणी समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT