पुणे

कर्तबगार महिलांची उलगडणार यशोगाथा

CD

पुणे, ता. २७ ः कुटुंब आणि विविध क्षेत्रातील करिअर घडविताना महिलांना विविध आव्हानांशी सामना करावा लागतो. त्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास देण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि कॅनेस्टेन पुण्यात घेऊन येत आहेत ‘पुढचं पाऊल’. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, प्रख्यात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रांतील कर्तबगार महिला या वेळी उपस्थित राहणार असून त्यांच्याबरोबर दिलखुलास गप्पा मारतानाच त्यांचा जीवन प्रवासही समजून घेता येईल.
घर, कुटुंब, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत महिलांनी भरारी घेतली आहे. या यशोगाथेबद्दल सांगणार आहेत रूपाली चाकणकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, इंग्रजी शिकविताना ‘यू-ट्यूब’वर इन्फ्ल्यूअन्सर झालेल्या ऐश्वर्या पाटेकर आणि कायदा क्षेत्रांत अनेक वर्षे कार्यरत असलेल्या ॲड. सुनीता जंगम. या प्रसंगी ‘त्वचेचे संवर्धन आणि आरोग्य’ या विषयावर नामवंत स्कीन स्पेशालिस्ट डॉ. अनिल पत्की मार्गदर्शन करतील. आरोग्यविषयक माहिती, प्रश्न-उत्तरे, मैत्रिणींशी गप्पा, मनोरंजनात्मक खेळ आणि खूप सारी बक्षीसे जिंकण्याची संधी या कार्यक्रमात असेल.
कॅनेस्टेन पावडर हे जगप्रसिद्ध बायर फार्मास्युटिकल्स आणि बायोटेक्नॉलॉजी कंपनीचे उत्पादन बुरशीप्रतिबंधक (अ‍ॅन्टीफंगल) क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहेत. कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या महिलांना त्याचे फ्री सॅंपल मिळणार आहे. हा कार्यक्रम महिलांसाठी खुला आहे. कार्यक्रमानंतर अल्पोपाहाराचीही व्यवस्था आहे. हा उपक्रम सर्व महिलांसाठी खुला आहे

उपक्रमाविषयी....
कधी ः रविवार (ता. ३०)
केव्हा ः सकाळी १०.३० वाजता
कुठे ः मॉडर्न कॉलेज ऑडिटोरियम, मॉडर्न इंजिनिअरिंग कॉलेज रोड, शिवाजीनगर, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT