पुणे

औद्योगिक व शिक्षण क्षेत्रात समन्वयाची गरज

CD

पुणे, ता. २९ ः गुणवत्तापूर्ण कामासाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योगांचा समन्वय महत्त्वाचा असून, त्यावर प्रभावी काम व्हायला पाहिजे. जर भारतीय रासायनिक उद्योगाला चीनमधून आयातीतील आव्हाने स्वीकारायची असतील, तर खर्चाची स्पर्धात्मकता साध्य करण्यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांना अर्थपूर्णपणे एकत्र काम करावे लागेल, असे मत कुरकुंभ एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष विकास टोपले यांनी व्यक्त केले.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअर्सच्या (आयआयसीएचई) पुणे प्रादेशिक केंद्राच्या वतीने आयोजिलेल्या ‘रासायनिक प्रक्रिया व अभियांत्रिकी’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे उद्‍घाटन टोपले यांच्या हस्ते झाले. ‘रासायनिक अभियांत्रिकी तत्त्वांच्या साहाय्याने रासायनिक प्रक्रिया सुधारणे’ ही चर्चासत्राची मध्यवर्ती संकल्पना होती.
एमआयडीसी कुरकुंभ येथे झालेल्या या चर्चासत्रात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), सिप्ला यांसह इतर संशोधन संस्थेतील रासायनिक अभियंते व शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. सिप्ला कुरकुंभचे वरिष्ठ उपाध्यक्ष मंगेश वझे, भगवान खंदार, पवन वाघमारे, एनसीएल येथील शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रोडे, डॉ. विनय भंडारी, डॉ. संजय कांबळे, अरुण कालगुड आदींनी आपली मते मांडली. चेतन सायनकर व विजय रेड्डी यांनी डिस्टिलेशन संदर्भातील सादरीकरण केले. ‘आयआयसीएचई’ प्रादेशिक केंद्राचे अध्यक्ष अलोक पंडित यांनी प्रास्ताविक तर यशवंत घारपुरे यांनी चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Beed Train: पुणे-बीड प्रवास आता सात तासांत; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज रेल्वेसेवेचा प्रारंभ; असे आहे वेळापत्रक

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Ganpati Panchayatan Sansthan Sangli : ‘किमान दोघांना लोळवण्याची ताकद’; अभिनेत्री भाग्यश्रीच्या पूजेवर विजयसिंह राजे संतापले

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Aaditya Thackeray: दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंचे मौन सुटले; म्हणाले, ‘मी त्यांना कधीही भेटलेलो नाही’

SCROLL FOR NEXT