पुणे

‘एमपीएससी’च्या इतिहासातील ‘सर्वोच्च’ परीक्षा आठ हजार जागांसाठी साडेचार लाखांपेक्षा जास्त उमेदवार स्पर्धेत

CD

पुणे, ता. ३० : एका खासगी टेलिग्राम संकेतस्थळावर हजारो विद्यार्थ्यांचे हॉलतिकिट लिक झाल्याच्या प्रकारानंतर महाराष्ट्र अराजपत्रित ‘गट-ब’ व ‘गट-क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ रविवारी पार पडली. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील जागा आणि उमेदवारांची संख्या याचा विक्रम मोडणारी ठरली आहे. यामध्ये तब्बल आठ हजार १६९ जागांसाठी साडेचार लाखांपेक्षा जास्त उमेदवार बसले होते.

ही परीक्षा सुरळीत पार पडली असून, राज्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, काही केंद्रांवर बायोमेट्रिक उपस्थिती नोंदविण्यास अडचण आल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर पार पडलेल्या परीक्षेसाठी उमेदवारांनी सकाळीच हजेरी लावली होती. या वेळी उमेदवारांची बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवित प्रवेश देण्यात आला. ज्या केंद्रांवर काही अडचणींमुळे बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवू न शकणाऱ्या उमेदवारांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असा खुलासा आयोगाच्या वतीने करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या विविध विभागांतील एकूण ८,१६९ जागा या परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत. आयोगामार्फत विज्ञापित केलेली आतापर्यंतची ही सर्वोच्च पदसंख्या आहे. तसेच अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची संख्यादेखील आयोगाच्या इतिहासातील सर्वोच्च संख्या आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अधिकृत ट्वीटर हॅंडल

बायोमेट्रिक व्यवस्था पडली अपुरी
‘एमपीएससी’च्या वतीने बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात आली. मात्र, अनेक केंद्रांवर बायोमेट्रिक संयंत्रांत त्रुटी असल्याने उमेदवारांना त्रास सहन करावा लागला होता. आयोगाने पुढीलवेळी निर्दोष संयंत्रांसह प्रशिक्षित मनुष्यबळाचा पुरवठा करावा, असा आग्रह उमेदवारांनी धरला आहे.

संयुक्त पूर्व परीक्षा थोडक्यात...
उमेदवारांची संख्या : ४,६७,०८५
परीक्षा केंद्रे : १,४७५
उपस्थिती : ८० टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT