पुणे

कॉंग्रेसभवनमध्ये ध्वजवंदन

CD

महाराष्ट्र दिनानिमित्त कॉंग्रेसभवनमध्ये माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या प्रसंगी शहराध्यक्ष अरविंद शिंदे तसेच उल्हास पवार, अभय छाजेड, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, नीता परदेशी, संगीता तिवारी, गोपाळ तिवारी आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवाजीनगर येथील कामगार स्मारक आणि स्वारगेट येथील कै. केशवराव जेधे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी दत्तात्रेय गायकवाड, अभय भगत, युवराज दिसले, श्रुतिका पाडळे, गणेश मापारी, राकेश गायकवाड, रणजित बहिरट, ऋषीकेश बालगुडे, बाळासाहेब खैरे आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसतर्फे पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उद्यानात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या कामगारांना अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अनुपम बेगी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी चेतन अग्रवाल, ऋषीकेश गोहर, भारत जाधव, दमयंती आहेर, राजेश सारश, महेंद्र चव्हाण, गोपाळ सोळंकी आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी(आझम कॅम्पस) मध्ये संस्थेचे अध्यक्ष तसेच ‘डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी’चे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे सचिव प्रा. इरफान शेख आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT