पुणे

‘कवितेस कारण की’ कार्यक्रमाचे सादरीकरण

CD

‘कवितेस कारण की’
कार्यक्रमाचे सादरीकरण
पुणे, ता. २ ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘आरपार’ प्रस्तुत ‘कवितेस कारण की’ हा कार्यक्रम सादर झाला. या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. ‘एखादी जखम पुरेशी असते, कवितेसाठी; कविता नसते, नुसती शब्दांची दाटी’ यांसारख्या वैविध्यपूर्ण कविता या वेळी सादर झाल्या. या कार्यक्रमात जयेश पवार, नैनेश तांबे, भैरवी चितळे, सारंग पांपटवार, अपूर्व राजपूत यांनी कवितांचे, गझलांचे प्रभावी सादरीकरण केले.

गीत-गझल गायनाचे अनोखे ‘सबरंग''
पुणे, ता. २ ः गीत-गझल-साज-आवाज यांच्या संगमाने सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित ‘सबरंग’ ही अनोखी मैफल स्मरणीय ठरली. राजेश दातार आणि निवेदिता साहा यांनी बहारदार गाणी सादर करत रसिकांचे रंजन केले. मैफलीची सुरुवात दातार यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गायलेल्या ‘महफील मे बहार है’ या गीताने झाली. ‘सलोनासा सजन है और मै हूँ’ या साहा यांनी सादर केलेल्या गीताला रसिकांची दाद मिळाली. ‘जब दीप जले आना’, ‘दिल चिज क्या है’ अशी चित्रपट गीते आणि ‘रंजीश ही सही’, ‘वो कागज की कश्ती’ आदी गझला त्यांनी सादर केल्या. या मैफलीला संवादिनीवर कुमार करंदीकर, तबल्यावर अमित जोशी, गिटारवर राहुल श्रीवास्तव आणि की-बोर्डवर रोहित कुलकर्णी यांनी समर्पक साथ केली. दीप्ती पेठे यांनी निवेदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT