पुणे

जीएंवर ‘नियतीवादी’चा शिक्का मारणे अयोग्य

CD

पुणे, ता. २ ः जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांमध्ये अनेक चांगली पात्रे नियतीच्या फेऱ्यात भरडली गेलेली दिसत असली, तरी जीए यांच्यावर नियतीवादीचा शिक्का मारणे अन्यायकारक ठरेल. कारण, मुळात जीएंना काव्यात्मक न्याय मान्य नव्हता, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांनी नुकतेच व्यक्त केले.

जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जी. ए. कुलकर्णी कुटुंबीय, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात वझे बोलत होते. याप्रसंगी जीएंच्या भगिनी नंदा पैठणकर आणि अक्षरधारा बुक गॅलरीच्या संचालक रसिका राठिवडेकर उपस्थित होत्या. वझे म्हणाले, ‘‘साहित्य वाचनातून जीवनाच्या कक्षा रुंदावतात. आपले अनुभवविश्व अधिक खोल खोल होते. लेखक त्याच्या साहित्य लेखनाद्वारे जगण्‍याच्या अपरिमित शक्यता धुंडाळत असतो. जीएंनी त्यांच्या कथांमधून नियतीवाद आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष नव्हे, तर त्यांचे नाते मांडले आहे.’’ या वेळी ‘हितगुज’ या कार्यक्रमात जीएंनी मुग्धा आणि मनीषाशी मारलेल्या गप्पांची ध्वनिफित रसिकांना ऐकता आली. तसेच ‘जागर’ प्रस्तुत ‘मुग्धाची रंगीत गोष्ट’ हे नाट्यअभिवाचन सादर करण्यात आले. याचे नाट्यरूपांतर भालचंद्र पंडित यांनी केले होते, तर दिग्दर्शन ऋता पंडित यांनी केले. नाट्याभिवाचन अमित वझे, विनीत कोंडेजकर, मानसी वझे, वृषाली साळुंके, संतोष कोल्हटकर, सुजाता देशपांडे, ऋचा केळकर आदी कलाकारांनी सादर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT