पुणे

काळदरीत माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न

CD

पुणे : काळदरी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री केदारेश्वर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयात १९९९-२००० मधील दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन गुरुजनांचे ऋण व्यक्त करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे औक्षण केले. दीपप्रज्वलन, रांगोळी, स्वागत गीत, अशा मंगलमय वातावरणात हा मेळावा पार पडला. यावेळी जयश्री परखंडे यांनी प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश कारकर यांनी केले. नंदकुमार जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले.

शाळा पूर्वतयारी मेळाव्यास विद्यार्थी-पालकांचा सहभाग
पुणे : कै. हंबीरराव कृष्णनाथ मोझे विद्यालयात मनपा शाळा क्रमांक ९० आणि १७ मुलींची, मुलांची शाळा क्रमांक १५८ आणि १०२ या चारही शाळांच्यावतीने शाळा पूर्व तयारीचा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात परिसरातील पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत मार्गदर्शन करणारे शिक्षक संतोष पुणेकर, शिक्षिका अश्विनी रोडे यांचा सत्कार महेंद्र पठारे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाळा क्रमांक ९०च्या प्रभारी मुख्याध्यापिका पूजा सोमवंशी, भारती साळुंखे, बारकू सोनवणे, कल्पना दुबे आदी उपस्थित होते. रोडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर पुणेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

शिष्यवृत्ती परीक्षेत साधना कन्या शाळेचे यश
पुणे : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत चं. बा. तुपे साधना कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी यश मिळविले आहेत. यात शाळेतील ११४ विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक ठरल्या आहेत. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत साधना कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी यश मिळविले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता कालेकर, पर्यवेक्षक छाया पवार, मंदाकिनी शिंदे, नितीन सोनवणे, विभाग प्रमुख आनंद दरेकर, नमिता बोडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT