पुणे

आराखडा सुरक्षित; पण ३० त्रुटी !

CD

पुणे, ता. २ ः शहरातील मेट्रो प्रकल्पाचे ऑडिट करून त्याचा तपासणी अहवाल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीओईपी) अखेर रविवारी दाखल केला. मेट्रोचा मार्ग आणि चारही स्थानकांचा पोलादी आराखडा (स्ट्रक्चर) व्यवस्थित असून किरकोळ प्रकारच्या सुमारे ३० त्रुटींचा त्यात समावेश आहे. त्यांची पूर्तता एक आठवड्यात करणार असल्याची ग्वाही ‘महामेट्रो’ने मंगळवारी दिली.
वनाज-गरवारे महाविद्यालय मार्गावरील वनाज, आनंदनगर, नळस्टॉप आणि गरवारे कॉलेज या स्थानकांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे, अशी मागणी नागरिक नारायण कोचक आणि शिरीष खासबारदार यांनी एका जनहितार्थ याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालयाने १७ एप्रिल रोजी निकाल दिला आणि ‘सीओईपी’ला स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा आदेश दिला होता.
न्यायालयाच्या आदेशानुसार, ‘सीओईपी’ने स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल रविवारी महामेट्रोला सादर केला. त्यात पोलादी आराखडा सुरक्षित आहे. परंतु, सुमारे ३० त्रुटींचा त्यात समावेश आहे. काही ठिकाणी वेल्डिंग व्यवस्थित झालेले नाही, काही ठिकाणी नटबोल्ट सैल झाले आहेत, मोठ्या स्क्रूंमध्ये वॉशरचा अभाव आहे, काही ठिकाणी लेव्हल मॅच झालेली नाही आदी प्रकारच्या त्रुटींचा त्यात समावेश आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी महामेट्रोने काम सुरू केले आहे. येत्या ७- ८ दिवसांत ते काम पूर्ण होईल, अशी ग्वाही महामेट्रोचे संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली. काम पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल ‘सीओईपी’ला पाठविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत कोचक यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, ‘‘सीओईपीने अहवाल दिला असेल तर, तो महामेट्रोने नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर करणे गरजेचे आहे. मेट्रोच्या कामासाठी नागरिकांचा पैसा वापरला जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेत कोणत्या त्रुटी आहेत, त्यांची पूर्तता कशी केली, हे नागरिकांना माहिती होणे गरजेचे आहे.’’ दरम्यान मी आणि खासबारदार यांनी २९ एप्रिल रोजी महामेट्रो आणि ‘सीओईपी’ला पत्र लिहून स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल जाहीर करण्याची मागणी केली आहे. मात्र, त्यावर दोन्ही संस्थांनी प्रतिसाद दिलेला नाही, असे कोचक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Gas Cylinder Shortage: बीडमध्ये घरगुती-व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा; ग्राहक रांगेत; साठा असूनही गॅस नाही

Latest Marathi News Live Update : ओडिशात आगीत दहा रुग्णांचा मृत्‍यू

Pune LPG Shortage : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! एलपीजी सिलिंडर घरपोच मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नागरिकांच्या रांगा झाल्या कमी

Pandharpur News: पंढरपुरातील इस्काॅन मंदिरात प्रसादासाठी पेटल्या चुली; अन्नछत्रालाही गॅस टंचाईचा मोठा फटका, भाविकांच्या भोजनावर मर्यादा!

Beed Road Construction Issue: रस्ता कामाला अडथळ्यांचा फेरा; बीडमध्ये चौपदरीकरणाचा वेग मंदावला; खोदकाम, धुळीचे लोट आणि वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT