पुणे

सातारा रस्त्यावर स्फोटांचे हादरे

CD

बिबवेवाडी, ता. २ : सातारा रस्त्यावरील एका घरगुती व स्वयंपाकघरासाठी लागणाऱ्या वस्तू विक्रीच्या दुकानामध्ये सोमवारी पहाटे सव्वादोन वाजता भीषण स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले असून दुकानासह अन्य सदनिका, दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने संपूर्ण परिसर मोठ्या प्रमाणात हादरला. अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळविले, मात्र इतका मोठा स्फोट नेमका झाला कसा, असा प्रश्‍न उपस्थित झाला असून, त्याचे कारण अद्याप पुढे आले नाही.
सातारा रस्त्यावरील डी मार्टजवळ इंद्रनील अपार्टमेंट आहे. त्यामध्येच ‘देवयानी होम व किचन अप्लायन्ससेस’ नावाचे दुकान आहे. संबंधित दुकानामध्ये सोमवारी पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोटाची घटना घडली. स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने संबंधित दुकानाच्या भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या, तर दुकानाचे शटर तब्बल शंभर फूट लांब उडून बाजूला पडले. स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला. दरम्यान, या वेळी लागलेल्या आगीत दुकानाचे मालक सुधीर कोलते तसेच रस्त्यावरून जाणारे हॉटेल व्यावसायिक सागर सणस यांच्या अंगावर दुकानाचे शटर उडून पडल्याने ते गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर नागरिकांनी अग्निशामक दलास माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच अग्निशामक दलाचे सात बंब, दोन टॅंकर घटनास्थळी दाखल झाले.

रात्री झोपेत असताना सव्वा दोनच्या सुमारास स्फोट झाला. हादऱ्याने आम्ही सर्व रहिवासी बाहेर पळालो. आगीची तीव्रता वाढत होती, घरातील दरवाजे खिडक्‍या निखळून पडल्या, काय होत आहे, हे कळत नव्हते. स्फोटांच्या भीतीमुळे सर्व रहिवासी रस्त्यावर येऊन थांबलो, असे रहिवासी रोहित कोळी यांनी सांगितले.


आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
दुकानात गॅस सिलिंडर नव्हते, मोबाईल बॅटरी, वॉटर प्युरिफायर, चिमण्या होत्या. फ्रीज, कुलरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याचा अंदाज आहे. परंतु स्फोटाची तीव्रता पाहता नक्की स्फोट कशामुळे झाला ते सांगता येत नाही, असे अग्निशामक दलाचे कात्रज केंद्राचे अधिकारी संजय रामटेके यांनी सांगितले. दरम्यान, स्फोट झालेल्या दुकानातील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर स्फोटाचे कारण पुढे येईल, असे सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी स्पष्ट केले.

UPN23B41931

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT