पुणे

पाठ्यपुस्तके महागली...!!

CD

पुणे, ता. ३ : शाळेचा वार्षिक निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षाच्या पाठ्यपुस्तकांची खरेदीची लगबग सुरू होते. दरम्यान, ही खरेदी करताना मात्र महागलेल्या पाठ्यपुस्तकांमुळे पालकांच्या खिशाला ‘अधिक’ची कात्री लागत आहे. यंदा पाठ्यपुस्तकांच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याने पालकांकडून ‘भाऊ, जुनीच पाठ्यपुस्तके आहेत का पहा ना...!!’, ‘आम्हाला पाठ्यपुस्तकांच्या जुन्या साठ्यातील पाठ्यपुस्तके द्या ना’ अशी विनवणी केली जात आहे.
जागतिक बाजारपेठेत कागदाच्या वाढलेल्या किमतीची झळ शालेय शिक्षणातील पाठ्यपुस्तकांना आणि ओघाने पालकांना बसत आहे. गेल्या वर्षी साधारणतः ७० ते ८० रुपयांना मिळणारी पाठ्यपुस्तके यंदापासून १०० ते ११५ रुपयांना, तर यापूर्वी १४० ते १९० रुपयांना मिळणारी पाठ्यपुस्तके आता १७० ते २४० रुपयांना बाजारात उपलब्ध आहेत. सध्या बाजारात दहावी-बारावीची नवी पाठ्यपुस्तके विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) छापण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांच्या किमतीत वाढ झाली आहे. तसे स्पष्टीकरण अद्याप बालभारतीने अधिकृतरीत्या दिलेले नाही, परंतु पाठ्यपुस्तके मात्र बाजारात आली आहेत. कागदाच्या वाढलेल्या किमती, छपाईचा खर्च आणि वाहतूक यामुळे किमतीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, काही विक्रेत्यांकडे मागील वर्षाच्या राखीव साठ्यातील पाठ्यपुस्तकेही उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांकडूनदेखील याच साठ्यातील पाठ्यपुस्तकांची मागणी होत आहे.

या पुस्तकांच्या किमती वाढल्या
बारावीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित भाग १ आणि २, जीवशास्त्र तसेच इयत्ता दहावीतील भाषाविषयांसह गणित भाग १ आणि २, विज्ञान भाग १ आणि २ यासह अन्य पाठ्यपुस्तकांच्या किमतीत वाढ झाली आहे.

कागद, डिझाइन, छपाई यांच्या वाढलेल्या किमतीमुळे पाठ्यपुस्तकांची किंमत वाढल्याचे बालभारतीकडून सांगण्यात येत आहे. मागील वर्षीची पाठ्यपुस्तके ही जुन्या किमतीची आहेत, तर नवीन पाठ्यपुस्तके ही वाढीव किमतीत आहेत. पालकांकडून जुन्या किमतीची पाठ्यपुस्तके देण्याची मागणी होत आहे. परंतु हा साठा मर्यादित आहे. त्यामुळे आमचाही नाइलाज होत आहे.
- पंकज शहा, पाठ्यपुस्तक विक्रेते, अप्पा बळवंत चौक

कागदाच्या किमती जागतिक स्तरावर वाढल्या आहेत. बालभारतीकडूनही पाठ्यपुस्तकांच्या किमतीबाबत लवकरच चित्र स्पष्ट करण्यात येईल.
- कृष्णकुमार पाटील, संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT