पुणे

जाणून घ्या बेकरी उत्पादने प्रक्रिया, व्यवसाय संधी

CD

सर्व आवृत्त्यांसाठी SIILCच्या लोगोसह वापरावी
जाणून घ्या बेकरी उत्पादने प्रक्रिया, व्यवसाय संधी
पुणे, ता. ७ : इतर व्यवसायांच्या तुलनेत बेकरी व्यवसायासाठी जास्त गुंतवणूक करावी लागत नाही. थोड्याशा गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करता येतो. वाढत्या मागणीमुळे बेकरी उत्पादनांना चांगली बाजारपेठ आहे. भरपूर संधी असणाऱ्या या व्यवसायाबाबत, त्यात बनविता येणारी उत्पादने व त्यासाठी लागणारी यंत्रे, पायाभूत सुविधा, प्रोजेक्ट प्लॅनिंग इत्यादी विषयी मार्गदर्शन करणारा दोन दिवसीय विकेंड सर्टिफिकेट कोर्स शनिवार (ता. १३) व रविवारी (ता. १४) सकाळ ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीच्या वतीने आयोजित केला आहे. या लघु उद्योगासाठी अंदाजे गुंतवणूक आदीविषयक टर्नकी प्रोजेक्ट सल्लागार मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय बेकरी प्रॉडक्टसचे प्रात्यक्षिक पाहता येण्यासाठी बेकरी इंडस्ट्रीला फिल्ड व्हिजीटचे नियोजन आहे. उद्योजक, नवउद्योजक, व्यावसायिक, विद्यार्थी, गृहिणी इ.साठी कोर्स फायदेशीर आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ४ हजार रुपये.

सौर ऊर्जेबाबत मार्गदर्शन कार्यशाळा
पुणे : सौर ऊर्जेबद्दल सविस्तर मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १४ मे रोजी आयोजित केली आहे. यामध्ये अपारंपरिक ऊर्जेबाबत माहिती, प्रकार आणि फायदे, सौर ऊर्जेचे महत्त्व, तांत्रिक माहिती, सौर ऊर्जेतुन वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांची माहिती व प्रकार, ग्रामीण व शहरी भागात सौर ऊर्जेचा वापर, केंद्र आणि राज्य सरकारचे सौर उर्जेबद्दलचे धोरण, सरकारच्या विविध योजना, नेट मेंटरिंग बद्दल माहिती, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, शेतीसाठी सौर ऊर्जेवर चालणारे पंप आणि त्याबद्दलच्या योजना, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीतर्फे होणाऱ्या योजना आणि त्यांचा लाभ कसा घ्यायचा त्याबद्दल माहिती, छोट्या गावांसाठी मायक्रो ग्रीड सोलर प्रकल्प, मोठे सौर प्रकल्प आणि त्याचे फायदे, सौर ऊर्जेचा व्यवसाय आदींबाबत माहिती आणि त्यातून निर्माण होणारे विविध रोजगार-कुशल, अकुशल कर्मचाऱ्यांची गरज, छोट्या शेतकऱ्यांसाठी किंवा सहकारी संस्थांसाठी सौर ऊर्जेवर चालणारे छोटे कोल्ड स्टोरेज सयंत्र, सूर्यकिरणे परावर्तित करणारा पेंट आणि त्याचा वापर घरातील किंवा गोदामातील वातावरण थंड ठेवण्यासाठी कसा करता येतो, आदींबाबतची माहिती देण्यात येईल. प्रतिव्यक्ती शुल्क १५०० रुपये.

ठिकाण : एसआयआयएलसी, सकाळनगर, गेट क्र.१, बाणेर रस्ता, औंध, पुणे
ऑनलाइन नोंदणी तसेच अधिक माहितीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT