पुणे

कुरुलकर यांना पाकिस्तानातून आलेल्या इ-मेलचा तांत्रिक तपास

CD

पुणे, ता. १३ : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या पुण्यातील संशोधन आणि विकास आस्थापना (आर ॲण्ड डीई) या प्रयोगशाळेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानातून आलेले आणि त्यांनी पाठवलेल्या इ-मेलचा तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे.

डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला (पीआयओ) काही संवेदनशील माहिती तसेच छायाचित्रे पाठविल्याचा संशय आहे. त्यानुसार ही चौकशी सुरू असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली. डॉ. कुरुलकर यांना अटक करण्यात आल्यानंतर एटीएसकडून करण्यात आलेल्या तपासाबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. डॉ. कुरुलकर यांच्याकडे सखोल तपास करायचा असून यांच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती एटीएसकडून करण्यात आली होती. त्यानंतर विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी डॉ. कुरुलकर यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप गंभीर आहेत, या प्रकरणाचा सखोल तपास होणे गरजेचे आहे, असे निरीक्षण नोंदवून त्यांच्या एटीएस कोठडीत १५ मेपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले होते. २०२२ मध्ये डॉ. कुरुलकर यांनी सहा देशांना भेटी दिल्या आहेत. शासकीय पासपोर्टद्वारे ते परदेशात गेले होते. शासकीय पारपत्राचा वापर करून ते पाकिस्तानी हेरांना भेटल्याचा संशय एटीएसला आहे. परदेशात ते कोणाला भेटले, यादृष्टीने त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SSLC Exam Result : दहावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; 'या' वेबसाइटवर पाहू शकता Result

Sakal Podcast: शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

Nagpur Earthquake : नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंप; आठवड्याभरात चौथ्यांदा हादरली जमीन; नागरिक भयभीत

Panchang 9 May : आजच्या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT