residential society sakal
पुणे

Residential Society Expenditure : खर्चच खर्च! पुणे महापालिकेत समाविष्ट गावांमधील सोसायट्यांचे आर्थिक गणित लागले बिघडू

परराज्यातून पुण्यात स्थलांतरित होणाऱ्यांसह शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक नागरिकांनी मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये राहण्यास प्राधान्य दिले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - तब्बल दिडशे सदनिका असणाऱ्या एका सोसायटीला त्यांच्या सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेद्वारे (एसटीपी) पाणी वापरण्यायोग्य करण्यासाठी दर महिन्याला किमान ४० ते ५० हजार रुपये खर्च करावा लागत आहे. त्यासाठीचे मनुष्यबळ, रसायने यांचा खर्च वेगळाच. तरीही वापरण्यायोग्य पाणी मिळत नाही. इतका खर्च करूनही टॅंकरच्या पाण्यावर होणारा खर्च देखील कमी होत नाही. त्यामुळे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील सोसायट्यांचे आर्थिक गणित अक्षरशः बिघडू लागले आहे. तर, दुसरीकडे संबंधित गावांमध्ये आवश्‍यक सांडपाणी वाहिन्या टाकण्याचे काम महापालिकेकडून अजून होत नाही.

परराज्यातून पुण्यात स्थलांतरित होणाऱ्यांसह शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक नागरिकांनी या भागातील मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये राहण्यास प्राधान्य दिले. अनेक नागरिकांनी समाविष्ट गावांमधील नव्याने झालेल्या सोसायट्यांमध्ये सदनिका घेतल्या. गावे महापालिकेत गेल्यामुळे पिण्याचे पाणी, ड्रेनेज, चांगले रस्ते मिळतील, अशा सोई-सुविधा लवकरच मिळतील, अशा सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा होत्या. बांधकाम व्यावसायिकांनी गावांचा महापालिकेत समावेश झाल्यामुळे २४ तास पाणी, ड्रेनेजची व्यवस्था, छान छान रस्त्यांचे आमिष दाखविले, त्यामुळे नागरिकांनीही सदनिका खरेदी केल्या. आता मात्र नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

अशी आहे स्थिती

- पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये नव्याने झालेल्या सोसायट्यांमध्ये सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा, सेप्टिक टॅंक सध्या आहेत.

- छोट्या सोसायट्यांमध्ये सेप्टिक टॅंक दर सहा महिन्याला किंवा दरवर्षी स्वच्छ करून घ्यावा लागतो.

- त्यासाठी संबंधित सोसायट्यांना एकावेळी ५०-६० हजार रुपये, असा वर्षातून दोनदा सुमारे एक ते सव्वा लाख रुपये त्यासाठी खर्च करावा लागतो.

- दुसरीकडे, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा असणाऱ्या सोसायट्यांचा प्रश्‍न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.

- सांडपाणी प्रक्रियेसाठी दर महिन्याला ऑपरेटरसाठी २० हजार, मटेअरिअलसाठी १० ते २० हजार, टेस्टिंग, वीजबिल असे एकूण ४० ते ५० हजार दर महिन्याला सोसायटीला खर्च करावा लागत आहे.

- इतके करूनही प्रक्रियायुक्त पाण्याचा दर्जा खराब असतो. त्यामुळे अनेकदा स्प्रिंकलर, ड्रीप खराब होतात.

- नाइलाजास्तव फ्लशसाठी याच पाण्याचा वापर करावा लागतो, अन्यथा पुन्हा जादा टॅंकरसाठी आणखी पैसे मोजावे लागत असल्याची सोसायट्यांची कैफियत आहे.

- एकीकडे प्रक्रियायुक्त पाण्यासाठीचा खर्च आणि दुसरीकडे टॅंकरसाठी होणारा खर्च, असा दुहेरी खर्चाचा बोझा सोसायट्यांना उचलावा लागत आहे.

प्रक्रियायुक्त सांडपाणी मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. तरीही चांगले पाणी मिळत नाही. प्रक्रियायुक्त पाणी व टॅंकरद्वारे मिळणारे पाणी, यासाठी दुहेरी खर्च होत आहे. हा आर्थिक बोझा सोसायट्यांना, सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही. त्यामुळे प्रशासनाने सांडपाणी वाहिन्यांचे जाळे निर्माण करण्यास प्राधान्य द्यावे.

- नीरज थोरात, माजी अध्यक्ष, सुखवानी पॅनोरमा, सूस

मोठ्या अपेक्षेने महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर दोन वर्षे होऊनही समस्या दूर होण्याचे नाव घेत नाही. महापालिकेच्या कार्यपद्धतीचा फटका नागरिकांना बसत आहे. याबाबत आपला अनुभव व सूचना सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या संकेतस्थळावर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉटसॲप क्रमांकावर नक्की कळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT