पुणे

जादा पैसे आकारणी पडली महागात

CD

पुणे, ता. २४ : रेल्वे स्थानकावरील पार्किंग चालकांच्या वारंवार तक्रारींनंतर रेल्वे प्रशासनाने त्याला एकूण १ लाख १० हजार रुपयांचा दंड केला आहे. शिवाय त्याचे टेंडर रद्द करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्या संबंधीची ठेकेदारास नोटीस देखील दिली जाणार आहे. रेल्वे प्रशासनाकडे आतापर्यंत या पार्किंग चालकाविषयी सुमारे १० ते १२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या नंतर वाणिज्य विभागाने कडक भूमिका घेऊन कारवाई करण्यास सुरवात केली आहे.
पुणे स्थानकावरील प्रिमियम पार्किंगचा ठेका के पद्मजा यांना देण्यात आला. प्रवाशांकडून जास्तीचे पैसे आकारणे, प्रवाशांशी उद्धट भाषेत बोलणे, गणवेश परिधान न करणे आदींविषयी रेल्वेला प्रवाशांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. रेल्वेने या पूर्वी ६० हजार रुपयांचा दंड आकाराला, तर नुकत्याच प्राप्त झालेल्या तक्रारींवरून आणखी ५० हजार रुपयांचा दंड आकारला आहे. तक्रारींचे वाढते स्वरूप लक्षात घेऊन वाणिज्य विभागाने त्याचे टेंडरच रद्द करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तत्पूर्वी संबंधित ठेकेदारास दोन दिवसांत नोटीस दिली जाणार आहे.

सद्यःस्थिती
रोज सुमारे ९०० गाड्या पार्किंगमध्ये
दुचाकी : १० रुपये (पहिल्या दोन तासांसाठी )
चारचाकी : २० रुपये (पहिल्या दोन तासांसाठी)
क्षेत्रफळ : ३१२५ चौरस मीटर

पार्किंगच्या ठेकेदाराविरोधात प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. टेंडर रद्द करण्याविषयी आम्ही विचार करीत आहोत.
डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळेंकडून दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

SCROLL FOR NEXT