Teacher esakal
पुणे

Pune News : महापालिकेत समाविष्ट गावांमधील शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक अद्यापही जिल्हा परिषदेच्या ताब्यात

राज्य सरकारने पुणे महापालिकेच्या हद्दीत ३४ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु या गावांमधील शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक मात्र अद्यापही जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्य सरकारने पुणे महापालिकेच्या हद्दीत ३४ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु या गावांमधील शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक मात्र अद्यापही जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहेत.

असे असताना महापालिकेने या गावांमधील शाळांसाठी इतर जिल्ह्यातून शिक्षकांच्या बदल्या करण्याची प्रक्रिया सुरु केल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेला या बदल्या करण्यामागे एवढी घाई का झाली, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

अशी आहे स्थिती
- महापालिकेच्या हद्दीत २०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट करण्यात आली.
- २०२० मध्ये उर्वरित २३ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला.
- त्यास तीन वर्ष होत आली, मात्र या गावांमधील शाळांबाबतचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे.
- परंतु महानगरपालिका व जिल्हा परिषद स्तरावर तो प्रलंबित आहे.
- त्यामुळे आजही या गावांमधील शाळा, तेथील विद्यार्थी आणि शिक्षक हे जिल्हा परिषदेकडेच आहेत.
- ते अद्यापही महापालिकेकडे वर्ग झालेले नाहीत.
- शाळा महापालिकेकडे वर्ग करण्यासंदर्भात महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्यामध्ये काही गोष्टींवर पत्रव्यवहार व चर्चा सुरु आहे.

काय आहे वाद?
या शाळांच्या मालमत्तेचे मूल्यांकन करून त्यांचे शुल्क जिल्हा परिषदेला द्यावे, तसेच अपुरी शिक्षक संख्या असल्यामुळे या शाळांमधील शिक्षक आमच्याकडेच ठेवावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेची आहे. तर मालमत्तेचे मूल्यांकन करून त्यांच्या मोबदल्यात भरपाई देण्यास महापालिकेने विरोध दर्शविला आहे. त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.

न्यायालयात धाव
समाविष्ट गावातील शाळेतील शिक्षकांनी शाळा महापालिकेत गेल्यामुळे आम्हालाही महापालिकेकडे वर्ग करावे, या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

त्यामुळे कोणतीही स्पष्टता नसताना महापालिकेने मात्र या गावातील शाळांमध्ये ७२७ शिक्षकांची गरज भासेल, असे गृहीत धरून २१९ शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीतून भरती केली आहे. तर उर्वरित ५०८ शिक्षकांची उपलब्धता करण्याचीही प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

शिक्षकांचे म्हणणे...
यापूर्वी महापालिकेच्या हद्दीत १९९७ मध्ये राज्य सरकारकडून २३ गावे समाविष्ट करण्यात आली. त्यावेळी ही गावे समाविष्ट करताना या गावातील शिक्षकांसह शाळांदेखील महापालिकेकडे वर्ग केल्या होत्या. तसे आदेश काढण्यात आले होते.

मात्र त्यानंतर ३४ गावे समाविष्ट करताना शाळांबाबत कोणतेही स्पष्ट आदेश न काढल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे. हा प्रश्‍न निकाली काढण्याऐवजी महापालिका प्रशासन आंतरजिल्हा बदल्यांवर का भर देत आहे, असा प्रश्‍न शिक्षण मंडळातील शिक्षकांकडून विचारला जात आहे.

या गावांमधील शाळा अद्याप महापालिकेकडे हस्तांतर झालेल्या नाहीत. त्यासंदर्भात लवकरच विभागीय आयुक्तांसमवेत बैठक होणार आहे. मात्र, शिक्षकांची गरज पाहता, आंतरजिल्हा बदलीतून २१९ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
- रवींद्र बिनवडे, अतिरीक्त आयुक्त, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT