पुणे

जीवनशैली हीच मधुमेहावरील उपचार पद्धती ठरेल : डॉ. दीक्षित

CD

पुणे, ता. ३ : ‘‘औषधाविना मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो, फक्त आहार-विहाराची शिस्त आणि शिस्तपालनातील सातत्य, सांभाळले पाहिजे, म्हणजे ‘दीक्षित जीवनशैली’ हीच मधुमेहावरील उपचार पद्धती ठरेल,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले.
‘असोसिएशन फॉर डायबेटिस अॅंड ओबेसिटी रिव्हर्सल’ (एडीओआरई) आणि ‘इन्फोसिस फाउंडेशन डायबेटिस केअर प्रोग्रॅम’ यांच्यातर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. जयंत नवरंगे, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. नरेंद्र जावडेकर आणि इन्फोसिस, पुणेचे उपाध्यक्ष प्रवीण कुलकर्णी उपस्थित होते.
डॉ. दीक्षित म्हणाले, ‘‘पुणे केंद्रातील अनेक सदस्यांनी आपले ‘एचबीए१सी’ औषधे न घेता किंवा ती बंद केल्यावर ६.५ च्या खाली नेले आहे. ही अवस्था किमान सहा महिने राहणे याला तांत्रिक भाषेत ‘डायबेटिस रेमीशन’ असे म्हणतात. पुणे केंद्रात तीन वर्षात किमान एक हजार रुग्ण मधुमेह मुक्त व्हावे, हे आमचे ध्येय आहे. हा कुठला ‘क्रॅश कोर्स’ नाही तर जीवनशैली आहे. ताज्या अहवालानुसार, आपल्या देशात ११.३ टक्के लोक मधुमेही आहेत. तर तब्बल २८ टक्के नागरिकांना लठ्ठपणाची समस्या आहे. इतक्या मोठ्या संख्येने विकारग्रस्तता असल्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत संशोधन न करता, त्यावरील नवी औषधे निर्माण करण्याकडे धोरणात्मक कल दिसतो. त्याऐवजी जीवनशैलीत बदल घडवून आणले पाहिजेत, हे समजून घेणे आवश्यक आहे.’’ डॉ. नवरंगे, डॉ. जावडेकर आणि कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले.
शिल्पा उनकुले यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास जोशी यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला, तर अविनाश गोखले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT