पुणे

फुकट्या प्रवाशांकडून दोन कोटी दंड वसूल

CD

पुणे, ता. ३ ः पुणे रेल्वे विभागात जून महिन्यात तिकीट तपासणी दरम्यान २५ हजार ३७७ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून दोन कोटी १४ लाख ६१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर आठ हजार ४७७ प्रवासी अनियमित प्रवास करताना आढळून आले असून त्यांच्यावर कारवाई करून सुमारे ५० लाख ९५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच सामान बुक न करताना नियमापेक्षा जास्त वजनाचे सामान घेऊन प्रवास करताना १६४ प्रवासी आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करीत २१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे व अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या नेतृत्वात पुणे स्थानकावर व विविध रेल्वे गाडीत करण्यात आलेल्या कारवाईत हा दंड केला आहे. यासाठी तिकीट निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलातील हवालदार यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिडकोच्या २६ हजार घरांवरील संभ्रम अखेर दूर! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; LIG लाभार्थ्यांमध्ये मात्र अनिश्चितता कायम

Crime News: महिलेला क्रूरपणे संपवले; शीर कापले अन् घेऊन गेले, धक्कादायक घटनेनं खळबळ

मिडल ईस्टच्या युद्धाचा मिडल क्लास लोकांना फायदा; 90 हजारपर्यंत करू शकता बचत, पेट्रोल-डिझेलच टेन्शन संपणार

Numerology : कुटुंबासाठी काहीही करू शकतात 'या' 4 मुलांकाचे लोक, कुणी अपमान केल्यास बदला घेण्यासाठी करतात हद्द पार

IPL 2026: 'मी जेव्हा CSK साठी खेळायचे, तेव्हा...' शिवम दुबेविरुद्ध आक्रमक सेलिब्रेशनवर जडेजाने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT