पुणे

पुणेकरांनो, पावसाळ्यात पाणी उकळून प्या !

CD

पुणे, ता. ६ ः पावसाळ्यात खडकवासला धरण प्रकल्पातून पुण्याला अशुद्ध पाणीपुरवठा होतो, अशा वेळी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेकडून तुरटी, पॉली ॲल्युमिनियम क्लोराइड (पीएसी) टाकून पाणीशुद्ध केले जाते. त्यासाठी पाणीपुरवठा विभागाने सुमारे १० कोटी रुपयांची तुरटी व पीएसी खरेदीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पावसाळ्यात नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
शहराच्या बहुतांश भागाला खडकवासला धरण प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो, तर खराडी व परिसरात भामा आसखेड धरणातून पुरवठा केला जातो. पावसाळ्यात धरणात पाण्याबरोबर माती वाहून येण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पाण्याची गढूळता वाढते. सामान्य स्थितीत धरणातील पाण्याच्या गढूळता (टर्बिडिटी) ५ निफोल टर्बिडियी युनिट (एनटीयू) असते. पण पावसाळ्यात हे प्रमाण २०० पेक्षा जास्त होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी निर्जंतुकीकरण करताना पाण्यात ‘पीएसी’ (पॉलि ॲल्युमिनिअम क्लोराइड) टाकले जाते. त्यामुळे पाण्याची गढूळता ही ५ एनटीयूपेक्षा कमी करता येते, तर सप्टेंबर महिन्यानंतर धरणातील पाण्याची गढूळता कमी होते, त्या वेळी तुरटीचा वापर केला जातो.
पाणीपुरवठा विभागाने या दोन्ही प्रकारची औषधे खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. यात पावसाळ्यासाठी ३ हजार ६६१ टन ‘पीएसी’ खरेदी केले जाणार असून, यासाठी ३ कोटी ९५ लाख रुपयांच्या निविदेचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे. ५ हजार ८०० टन तुरटी खरेदी केली जाणार आहे. त्यासाठीच्या ५ कोटी ९३ लाख रुपयांच्या खरेदीस पूर्वगणनपत्रक समितीने (इस्टिमेट कमिटी) मान्यता दिली. त्यामुळे आता याची निविदा होणार आहे.

पावसाळ्यात गढूळ पाणी येऊ नये, यासाठी पाण्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. त्यासाठी तुरटी, पीएसी खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिकेकडून काळजी घेतली जात आहेच; नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT