पुणे

दस्तनोंदणीसाठी आता टोकन पद्धत

CD

पुणे, ता. ६ : पुणे, पिंपरी-चिंचवड भागात असलेल्या दस्तनोंदणी कार्यालयांतील अपुऱ्या सुविधा, जागेचा अभाव तसेच सर्व्हर डाउनमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर नागरिकांना दिलासा देण्यासाठी १५ जुलैपासून शहरातील २७ दुय्यम निबंधक कार्यालयांत ‘टोकन’ पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. ही पद्धत प्रायोगिक तत्त्वावर असणार आहे. ती यशस्वी झाल्यास १५ ऑगस्टपासून दोन्ही शहरांमध्ये कायमस्वरूपी हीच पद्धत राबविण्यात येणार आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील विविध दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्तनोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यात दुय्यम निबंधक कार्यालयांत पाणी, शौचालये, स्वच्छतागृहे, अपुरी जागा अशा पायाभूत सुविधांचा अभाव, सर्व्हर डाउन होणे किंवा संथगतीने चालणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. कार्यालयांची ही स्थिती सुधारण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व्हरवर ताण येत असल्याने तो वारंवार डाउन होत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. या पार्श्वभूमीवर आता १५ जुलैपासून प्रायोगिक तत्त्वावर टोकन पद्धती सुरू करण्यात येणार आहे, असे सहजिल्हानिबंधक संतोष हिंगाणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT