पुणे

शिक्षकभरतीच्या मुलाखतीसाठी आता १:३ प्रमाण निश्चित

CD

पुणे, ता. ६ : राज्यातील खासगी शाळांमध्ये शिक्षक भरती दरम्यान पवित्र पोर्टलद्वारे मुलाखतीसह विकल्पासाठी यापूर्वी एका जागेकरिता दहा उमेदवारांची (१:१०) शिफारस करण्यात येत होती. परंतु आता खासगी शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेतंर्गत मुलाखतीसाठी आता एका जागेसाठी केवळ तीन उमेदवारांची (१:३) शिफारस करण्यात येणार आहे.
राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे उच्चतम गुण मिळालेल्या उमेदवारांपैकी शिक्षक सेवकांची अंतिम निवड मुलाखतीद्वारे संबंधित संस्था करते. ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’च्या आधारे आणि शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीसह विकल्प निवडलेल्या खासगी शाळांमधील शिक्षक सेवकांच्या निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने कार्यपद्धतीत शालेय शिक्षण विभागाने सुधारणा केली आहे. खासगी शाळांमधील शिक्षण सेवकांच्या मुलाखतीद्वारे अंतिम निवडीसाठी प्रत्येक रिक्त शिक्षकीय जागेकरिता १:१० याऐवजी आता १:३ गुणोत्तराप्रमाणे उमेदवारांचा प्राधान्यक्रम, गुणानुक्रम, पदासाठीचे माध्यम, प्रवर्ग, विषय आणि बिंदूनामावलीनुसार उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांची निवडसूची संबंधित व्यवस्थापनाच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
संबंधित शिक्षण संस्थेने अशा उमेदवारांची मुलाखत घेऊन मुलाखत आणि अध्यापन कौशल्याद्वारे एकूण ३० गुणांसंदर्भात या उमेदवारांचे गुणपत्रक आणि निकाल पवित्र प्रणालीवर जाहीर करायचा आहे. त्या आधारे पवित्र पोर्टलमधील शिफारस केलेले आरक्षण आणि विषय विचारात घेऊन उच्चतम गुण मिळालेल्या उमेदवारांची रिक्त पदावर निवड करायची आहे. मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी दिलेल्या एकूण ३० गुणांसंदर्भात शिक्षण आयुक्त यांनी मानक कार्यपद्धती तयार करावी, असे शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी अध्यादेशात म्हटले आहे.

खासगी शैक्षणिक संस्थावरील शिक्षकांच्या पदभरतीसाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर त्याला आता यश आले आहे. पूर्वीच्या १:१० प्रमाणात बदल करून १:३ प्रमाण करण्यासाठी अनेक आंदोलने केली आणि त्याद्वारे ही मागणी लावून धरली होती. त्याला आता न्याय मिळाला आहे. फक्त ही शिक्षक भरती पारदर्शकपणे व्हावी, त्यात कोणताही घोडेबाजार होऊ नये, अशी अपेक्षा आहे.’’
- संदीप कांबळे, अध्यक्ष, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd Test Live: KL Rahul ची चूक महागात पडली; आकाश दीपची मेहनत वाया... पहिल्या सत्रात बरंच काही घडलं, शेवटच्या चेंडूवर विकेट

Video : १५० धावांचे लक्ष्य, ३ फलंदाज ५ धावांत तंबूत... मग 'तो' भिडला, वानखेडे स्टेडियमवर शतक ठोकून संघाला जिंकवले; 9 Six, 6 fours

IND vs NZ 2nd Test Live: स्टम्प उडतोय, स्पष्ट दिसतंय... तरीही टॉम लॅथमला अम्पायरने वाचवले; जसप्रीत बुमराहने पाचव्या चेंडूवर दिलेला धक्का, मग काय घडलं?

IND vs NZ 2nd Test Live: यशस्वी जैस्वालचा वर्ल्ड रेकॉर्ड; सचिन तेंडुलकरला मागे सोडले, ३२ वर्ष जून्या अचंबित करणाऱ्या विक्रमाशी बरोबरी

IND vs NZ 2nd Test Live: मोहम्मद सिराज 'बाकावरच'; भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये थक्क करणारा बदल; वाचा कोण IN, कोण OUT

SCROLL FOR NEXT