पुणे

शिक्षकभरतीच्या एका जागेच्या मुलाखतीसाठी आता तीन उमेदवारांना करता येणार अर्ज

CD

पुणे, ता. ८ : राज्यातील खासगी शाळांमध्ये शिक्षक भरती दरम्यान पवित्र पोर्टलद्वारे मुलाखतीसह विकल्पासाठी यापूर्वी एका जागेकरिता दहा उमेदवारांची (१:१०) शिफारस करण्यात येत होती. परंतु आता खासगी शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेतंर्गत मुलाखतीसाठी आता एका जागेसाठी केवळ तीन उमेदवारांची (१:३) शिफारस करण्यात येणार आहे.
राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे उच्चतम गुण मिळालेल्या उमेदवारांपैकी शिक्षक सेवकांची अंतिम निवड मुलाखतीद्वारे संबंधित संस्था करते. ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’च्या आधारे आणि शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीसह विकल्प निवडलेल्या खासगी शाळांमधील शिक्षक सेवकांच्या निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने कार्यपद्धतीत शालेय शिक्षण विभागाने सुधारणा केली आहे. खासगी शाळांमधील शिक्षण सेवकांच्या मुलाखतीद्वारे अंतिम निवडीसाठी प्रत्येक रिक्त शिक्षकीय जागेकरिता १:१० याऐवजी आता १:३ गुणोत्तराप्रमाणे उमेदवारांचा प्राधान्यक्रम, गुणानुक्रम, पदासाठीचे माध्यम, प्रवर्ग, विषय आणि बिंदूनामावलीनुसार उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांची निवडसूची संबंधित व्यवस्थापनाच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
संबंधित शिक्षण संस्थेने अशा उमेदवारांची मुलाखत घेऊन मुलाखत आणि अध्यापन कौशल्याद्वारे एकूण ३० गुणांसंदर्भात या उमेदवारांचे गुणपत्रक आणि निकाल पवित्र प्रणालीवर जाहीर करायचा आहे. त्या आधारे पवित्र पोर्टलमधील शिफारस केलेले आरक्षण आणि विषय विचारात घेऊन उच्चतम गुण मिळालेल्या उमेदवारांची रिक्त पदावर निवड करायची आहे. मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी दिलेल्या एकूण ३० गुणांसंदर्भात शिक्षण आयुक्त यांनी मानक कार्यपद्धती तयार करावी, असे शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी अध्यादेशात म्हटले आहे.

खासगी शैक्षणिक संस्थावरील शिक्षकांच्या पदभरतीसाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर त्याला आता यश आले आहे. पूर्वीच्या १:१० प्रमाणात बदल करून १:३ प्रमाण करण्यासाठी अनेक आंदोलने केली आणि त्याद्वारे ही मागणी लावून धरली होती. त्याला आता न्याय मिळाला आहे. फक्त ही शिक्षक भरती पारदर्शकपणे व्हावी, त्यात कोणताही घोडेबाजार होऊ नये, अशी अपेक्षा आहे.
- संदीप कांबळे, अध्यक्ष, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT