पुणे

ऑनलाइन परीक्षेसाठी ‘आयबीपीएस’ला आगाऊ रक्कम

CD

पुणे, ता. ६ ः पुणे महापालिकेकडून आस्थापनेवरील वर्ग १ ते ३ या पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. संबंधित परीक्षेची जबाबदारी ‘आयबीपीएस’ या संस्थेवर असून या परीक्षेसाठी संस्थेला ५८ लाख रुपये आगाऊ देण्यास महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये मान्यता देण्यात आली.

महापालिकेकडून घेण्यात येणाऱ्या वर्ग १ ते ३ वरील पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी आवश्‍यक ऑनलाइन परीक्षा घेण्याची जबाबदारी ‘आयबीपीएस’ने घेतली आहे. त्यानुसार, या संस्थेस ६४ लाख ५१ हजार रुपये इतका खर्च येणार आहे, दरम्यान, या परीक्षेसाठी एकूण रकमेच्या ९० टक्के म्हणजेच ५८ लाख रुपये इतकी आगाऊ रक्कम देण्यात यावी, याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मांडण्यात आला होता. त्यास महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली. दरम्यान, परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित १० टक्के म्हणजेच साडे सहा लाख रुपयांची रक्कम संस्थेला दिले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला! सिल्व्हर ओक निवासस्थानी सांत्वन भेट

Manipur Government Formation Update: मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग!, भाजपसह सर्व ‘NDA’ आमदारांना दिल्लीला बोलावले

Latest Marathi News Union Budget 2026: व्हेनेझुएलाकडून भारत तेलाची खरेदी करणार - डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

Nagpur Municipal Corporation: नागपूर महानगरपालिकेत भाजपने १०२ नगरसेवकांचे राजीनामे घेतले; नेमकं कारण काय?

Pune News : वैद्यकीय पर्यटनाला मिळेल चालना, आयात शुल्क कमी केल्याने औषधे स्‍वस्‍त; आरोग्य क्षेत्रातील तज्‍ज्ञांनी व्‍यक्‍त केले समाधान

SCROLL FOR NEXT