पुणे

घनकचरा व्यवस्थापनासाठी भारत फोर्जचा पुढाकार

CD

पुणे, ता. ८ ः भारत फोर्ज लि. कंपनी व नो हाउ फाउंडेशन यांच्या वतीने पर्यावरण संरक्षणाच्या हेतूने हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात वैयक्तिक स्वरूपाचा ‘घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प’ राबविण्यात आला आहे. या प्रकल्पात ७०० किलो कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे खत तयार करण्यात आले आहे.
शहरात कचऱ्याच्या समस्येमुळे विविध प्रकारच्या प्रश्‍नांना नागरिकांना सामोरे जावे लागते, हे लक्षात घेऊन भारत फोर्ज कंपनीने हा उपक्रम सुरू केला आहे. कंपनी व फाउंडेशनच्या वतीने हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत वैयक्तिक स्वरूपाचा ‘घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प’ राबविण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ७०० किलो कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर करण्यात आले. शुक्रवारी फ्लोरिडा इंग्रजी माध्यम शाळा, आदर्श माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, परिसरातील सोसायट्यांमधील नागरिक यांच्या उपस्थितीत जनजागृती करण्यात आली. प्रकल्पाचे उद्‌घाटन डॉ. दादा कोद्रे, जिल्हा परिषद माजी सदस्य वंदना कोद्रे यांच्या उपस्थित झाले. या वेळी मुख्याध्यापक भगवान बनसोडे, नलिनी पांडे, भारत फोर्जचे कर्मचारी अभिजित पाटील, प्रशांत पुराणिक, अंजली यादव, शिवानंद स्वामी, विजय भालेकर, कुमार ओहाळ आदी उपस्थित होते. याचे आयोजन भारत फोर्ज सीएसआर टीम व इनोरा टीम यांच्या वतीने करण्यात आले होते.
PNE23T54091

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belgaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT