पुणे

‘आठवणीतले भाई’ पुस्तकाचे प्रकाशन

CD

पुणे, ता. ८ ः ‘कोकणस्थ परिवार, पुणे’ यांच्यातर्फे संस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ क्रीडा संघटक दीनानाथ केशव ऊर्फ भाई नेवरेकर यांच्यावर आधारित सुनिल नेवरेकर संपादित ‘आठवणीतले भाई’ या पुस्तकाचे प्रकाशन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते नुकतेच झाले. या प्रसंगी आमदार रवींद्र धंगेकर, माजी महापौर अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, ज्येष्ठ पत्रकार रमेश डोईफोडे, प्रकाश रेणुसे, अॅड. विजय सावंत आदी उपस्थित होते. श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘‘नेवरेकर हेल्थ होम या हॉटेलच्या माध्यमातून भाई नेवरेकरांचा अनेक माणसांशी संपर्क आला. त्यातील प्रत्येक कर्तृत्ववान माणसाचे गुण भाईंनी हेरले आणि त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम केले.’’ या वेळी पाटील यांच्या हस्ते पंडित वसंतराव गाडगीळ, प्रफुल्ल कुलकर्णी, गणेश निकम, सुभाष पेडणेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपिन हसबनीस यांचा सत्कार करण्यात आला. विशाल पाटील, नरेश पेडणेकर यांनी स्वागत केले. पराग गानू यांनी प्रास्ताविक केले. संजय गोखले यांनी सूत्रसंचालन केले. सोनिया नेवरेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran War : अमेरिका इराणमध्ये पाठवणार २५०० सैनिक, होर्मूज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी नवा प्लॅन

Diesel Price: मोठा झटका! पेट्रोलनंतर डिझेलही महागलं; तब्बल २२ रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर...

Unseasonal Rain Hits KedarKheda Region : केदारखेडा परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; गहू-हरभरा-ज्वारी पिकांचे मोठे नुकसान

Mumbai News: कोठडीतील मृत्यू हृदयविकाराने! वडाळा ट्रक टर्मिनल पोलिस दोषमुक्त, नेमकं प्रकरण काय?

प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! मुंबई लोकलच्या 'या' रेल्वे स्टेशनवर 'स्लीपिंग पॉड्स' सुरू होणार; काही तासांसाठी आरामाची खात्री

SCROLL FOR NEXT