पुणे

मराठी अभ्यासक्रम मंडळाच्या सदस्यपदी राजीव बर्वे

CD

मराठी अभ्यासक्रम मंडळाच्या सदस्यपदी राजीव बर्वे
पुणे, ता. १० ः अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष आणि लेखक राजीव बर्वे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी भाषा अभ्यासक्रम मंडळावर स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिलीपराज प्रकाशनाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे ते मराठी साहित्यविश्वात कार्यरत आहेत. त्यांच्या प्रकाशन संस्थेस आजवर १२६ राज्य पुरस्कार, दोन वेळा साहित्य अकादमी पुरस्कार आणि ‘सरस्वती सन्मान’ यासारखे मानाचे पुरस्कार लाभले आहेत. तसेच सुमारे आठ वर्षे ते प्रकाशक संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

पं. शौनक अभिषेकी यांना ‘बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार’ जाहीर
पुणे, ता. १० ः बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला जाणारा ‘बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ गायक पं. शौनक अभिषेकी यांना जाहीर झाला आहे. रोख रुपये ५१ हजार आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून, शनिवारी (ता. १५) सायंकाळी पाच वाजता बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर आणि कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. याच कार्यक्रमात मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या इतर पुरस्कारांचे वितरणही करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरणानंतर ‘गंधर्वांजली’ ही नाट्य संगीताची मैफल सादर करण्यात येणार आहे. रविवारी (ता. १६) सायंकाळी पाच वाजता ‘संत कान्होपात्रा’ या संगीत नाटकाचा प्रयोग होणार आहे. या मैफल आणि नाट्यप्रयोगासाठी विनामूल्य प्रवेश आहे.

कारगिल विजय दिनी रक्तदान शिबिर
पुणे, ता. १० ः कारगिल विजय दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त येत्या २६ जुलैला कारगिल येथे जाऊन रक्तदान शिबिर व शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संकल्प सेवा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला आहे. रक्तदानाविषयी जनजागृती व कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष भरत सुराणा आणि अरुण कटारिया यांनी सोमवारी (ता. १०) पत्रकार परिषदेत सांगितले. हा उपक्रम संकल्प फाउंडेशन आणि ‘सरहद, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या रक्तदानासाठी पुण्याहून रक्तदाते जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

Barshi Drought: साहेब, पाणीच नाही तर लग्नेही जमत नाहीत’; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे साकडे

Marathwada Rain: ५० दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात पाऊस; हिंगोली, जालना, नांदेडसह धाराशिवमध्ये सरी

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव; यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता

Global Warming: ‘सुपर एल निनो’मुळे १५ हजार मृत्यूचा धोका; शिकागो विद्यापीठाचा इशारा, जमीन आणखी तापणार

SCROLL FOR NEXT