पुणे

गुरुशिवाय संस्कार प्राप्त होत नाहीत : पं. सुरेश तळवलकर

CD

पुणे, ता. १० : विद्यार्थी-शिष्य-कलाकार-शिक्षक-गुरू हे अखंडितपणे सुरू राहणारे चक्र आहे. शास्त्र समजावले जाते, तंत्र शिकवले जाते, विद्या दिली जाते, तर कला मात्र संस्कारित होते. साधना संस्कारांशिवाय साध्य होत नाही आणि संस्कार गुरूशिवाय प्राप्त होत नाहीत, अशा शब्दांत ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद केले.
आवर्तन गुरुकुलतर्फे आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या अखेरच्या सत्रात शिष्यांनी गुरुपूजन केल्यानंतर त्यांना मार्गदर्शन करताना पं. तळवलकर बोलत होते. पं. तळवलकर यांचे पूजन ईशान परांजपे, ज्येष्ठ नृत्यगुरु सुचेता भिडे-चापेकर यांचे पूजन मुग्धा असनीकर, पं. रामदास पळसुले यांचे पूजन गणेश तानवडे आणि पं. निषाद बाकरे यांचे पूजन साहिल भोगले या शिष्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात केले.
सुचेता भिडे-चापेकर म्हणाल्या, ‘‘अज्ञानाच्या अंध:कारात ज्ञानाचे काजळ डोळ्यात घालून गुरू शिष्याला मार्गदर्शन करत असतो. गुरूने शिकवलेले ज्ञान पचवून त्यात भर घालून शिष्याने पुढे न्यावे, अशी प्रत्येक गुरूची अपेक्षा असते. आवर्तन गुरुकुलाच्या माध्यमातून गुरू-शिष्य परंपरा प्रवाहित राहून शिष्यांना हक्काचे व्यासपीठ मिळत आहे.’’
तीन दिवसीय महोत्सवाच्या अखेरच्या दिवसातील सकाळच्या सत्रात पखवाज आणि तबलावादन झाले. दुसऱ्या सत्रात पं. रामदास पळसुले यांच्या शिष्यांचे तबलावादन झाले. विद्यार्थ्यांनी ताल दीपचंदीचे सादरीकरण केले. सायंकाळच्या सत्राची सुरुवात पं. निषाद बाकरे यांचे शिष्य साहिल भोगले यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. समारोपाच्या सत्रात पं. सुरेश तळवलकर यांच्या शिष्यांचे तबलावादन झाले. ऋतुजा फुलकर यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court : “निःपक्षपातीपणे अन् न्याय्य पद्धतीने काम करा, न्यायालयाचा भार वाढवू नका”; निवडणूक आयोगाला हायकोर्टाने फटकारलं

Pune Ganpati Visarjan Live Tracking: गणपती विसर्जन मिरवणूक Live; कोणतं मंडळ कुठे पोहोचलं? एका क्लिकवर पाहा लाईव्ह लोकेशन अन् ट्रॅफिक अपडेट्स

Raj Thackeray On Gyanesh Kumar : ‘ज्ञानेशाकडून सत्तेतले रेडे आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर पुन्हा निशाणा

Maharashtra Drought Subcommittee : बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना नऊ मंत्र्यांसह मुख्य सचिवांचा समावेश

Maharashtra Ganesh Visarjan Live: पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात Live पाहा, ढोलताशांच्या गजरात भक्तांचा उत्साह शिगेला

SCROLL FOR NEXT