पुणे

नैसर्गिक खाद्यतेल उत्पादन प्रक्रिया प्रशिक्षण

CD

पुणे, ता. १० : लाकडी घाणा तेल उद्योग या पारंपरिक व्यवसायाला सध्या आरोग्यासंबंधी झालेल्या जागृतीमुळे चांगले दिवस आले आहेत. केमिकलविरहित तेलापेक्षा लाकडी घाणा किंवा यांत्रिक घाणा वापरून कोल्ड प्रेस ऑइल खाण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. कमी गुंतवणुकीत करता येणाऱ्या, वाढती मागणी असणाऱ्या या लघुउद्योगाचे प्रात्यक्षिकांवर आधारित प्रशिक्षण २२ व २३ जुलैला आयोजिले आहे. प्रशिक्षणात लाकडी घाण्यावर शेंगदाणा, तीळ व खोबरे यांचे तेल उत्पादन कसे घेतात, तेल प्रक्रिया कशी होते, पेंड कशी काढतात, पाण्याचे प्रमाण कसे असावे इ.विषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन होणार आहे. तसेच लाकडी घाण्याऐवजी वापरल्या जाणाऱ्या कोल्ड प्रेस एक्सपेलर मशिनची माहिती दिली जाणार आहे. लाकडी घाण्यापेक्षा यामध्ये मोठ्या प्रमाणात तेल उत्पादन घेता येते. पेंड पातळ निघते व योग्य दारात कोल्ड प्रेस्ड फिल्टर्ड ऑइल म्हणून विकता येते. लाकडी घाणा युनिट तसेच कोल्ड प्रेस एक्सपेलर युनिटला प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क पाच हजार रुपये.

प्रशिक्षणातील विषय
- कोल्ड प्रेस ऑइल म्हणजे काय
- तेल उत्पादन, प्रक्रिया प्रकार
- तेल बियांच्या जाती, पॅकिंग व ब्रँडिंग
- आवश्यक मशिनरी
- पेंड प्रक्रिया व विक्री
- व्यवसायाचे अर्थशास्त्र
- सोशल मीडियाद्वारे मार्केटिंगच्या पद्धती

फ्रोजन फूड व्यवसायातील संधी
फ्रोजन फूड व त्याच्या व्यवसायातील संधी यासंबंधाने माहिती करून देणारी कार्यशाळा शनिवारी (ता. १५) व रविवारी (ता. १६) आयोजिली आहे. कार्यशाळेत शनिवारी फ्रोजन फूड म्हणजे काय हे सांगून व्हेजिटेबल टिक्की, बर्गर टिक्की, नगेट्स, व्हेजिटेबल नगेट्स, चीज नगेट्स, चिकन टिक्की, चिकन नगेट्स, चपाती, पराठा, स्वीट कॉर्न, मटार, पायनापल, व्हेजिटेबल हे फ्रोजन पदार्थ तयार करण्याच्या व्यावसायिक पद्धती व प्रिझर्वेशन प्रात्यक्षिकांसह शिकवले जाणार आहे. रविवारी फ्रोजन फूडसाठी लागणाऱ्या मशिनरी, प्रोजेक्ट रिपोर्ट, लोगो, शासकीय अटी, नियम व लायसन, कॉस्टिंग, लेबलिंग, पॅकिंग, मार्केटिंग आणि हा व्यवसाय कसा सुरू करावा, याविषयी शास्त्रशुद्ध माहिती दिली जाईल. प्रतिव्यक्ती शुल्क चार हजार रुपये. गुरुवारपर्यंत (ता. १३) नोंदणी केल्यास पाचशे रुपये सवलत आहे.
ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे, संपर्क : ९१४६०३८०३१, ८९५६३४४४७२.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT