Narendra Modi esakal
पुणे

PM Narendra Modi : असा असेल नरेंद्र मोदींचा पुणे दौरा! विविध प्रकल्पांचे होणार उद्‌घाटन

मेट्रो नविन मार्गिका सेवांचे लोकार्पण, पंतप्रधान आवास योजना गृहप्रकल्पासह विविध प्रकल्पांचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी (ता.1) लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, त्यानिमित्त पंतप्रधान मोदी पुण्यात येणार असून त्यांच्या हस्ते मेट्रोच्या नव्या मार्गिका सेवांचे उद्‌घाटन, पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पांचे लोकार्पण, नव्या गृहप्रकल्पांची पायाभरणी यासह विविध प्रकारच्या प्रकल्पांचे उद्‌घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे देण्यात येणारा "लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला. मंगळवारी 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिवशी लोकमान्य टिळक पुरस्कार पुरस्कार वितरीत केला जातो.

पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार देण्यात येणार असून मंगळवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हा कार्यक्रम होईल. तत्पुर्वी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात श्रींची पूजा करणार आहेत. त्यानंतर दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास मेट्रो प्रकल्पाच्या नव्या दोन मार्गिकांच्या सेवेचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

मेट्रोच्या नव्या मार्गिका सेवांमध्ये फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल रुग्णालय स्थानकांचा समावेश आहे. 2016 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती.

मेट्रोची नविन मार्गिका शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय (आरटीओ) आणि पुणे रेल्वे स्थानक या ठिकाणांना जोडणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्‌घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 300 कोटी रुपये खर्चून विकसित केलेल्या या संयंत्राच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 2.5 लाख मेट्रिक टन कचरा वापरून वीज निर्मिती केली जाणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे "सर्वांसाठी घरे' या उपक्रमाअंतर्गत बांधण्यात आलेली 1280 हून अधिक घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. याबरोबरच पुणे महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेली 2650 हून अधिक घरांचा देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची 1190, तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या 6400 हून अधिक घरांची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT