पुणे

दिव्यांग, अनाथांसाठी निवासी प्रशिक्षण सुविधा

CD

पुणे, ता. १० ः दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबलअंतर्गत पुण्यात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अठरा वर्षांवरील दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण, विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी येथे ८० निवासी जागा उपलब्ध आहेत. अठरा वर्षावरील अस्थिव्यंग, अंध, कर्णबधिर, इतर दिव्यांग विद्यार्थ्यांना, तसेच आई व वडील दोन्ही नसणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

याअंतर्गत यूपीएससी, एमपीएससी, बँक, एमबीए प्रवेश परीक्षा, एमएसडब्ल्यू प्रवेश परीक्षा इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठी निवासी विनामूल्य मार्गदर्शन प्रशिक्षण दिले जाते. पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन व्यवस्था व मार्गदर्शन केले जाते. अंध विद्यार्थ्यांना संगणक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण आणि करिअर मार्गदर्शन केले जाते. विविध दिव्यांग प्रकारातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजांनुसार शिकवणारे तज्ञ मार्गदर्शक, विशेष तंत्रज्ञान व ॲक्सेसिबिलिटीसाठी आवश्यक सुविधा पुरविल्या जातात. या निवासी प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांनी सविस्तर माहितीसह अर्ज ३० जुलैपर्यंत ९३७३६९५५६९ या क्रमांकावर अथवा दीपस्तंभ फाउंडेशन, मनोबल, भारती विद्यापीठ हॉस्पिटलच्या बाजूला, चैतन्य नगर, छोटा शंकर महाराज मठाजवळ, धनकवडी, पुणे या पत्त्यावर पाठवावे. गुणवत्तेनुसार व गरजेनुसार निवड प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

SCROLL FOR NEXT