पुणे

बेबी, अधिक माहितीसाठी तुला भेटावे लागेल

CD

पुणे, ता. १० : झाराने विचारले, ‘ब्रह्मोस हे तुझे इनव्हेशन आहे का?’ डॉ. प्रदीप कुरुलकर म्हणाला, ‘‘माझ्याकडे सर्व ब्रह्मोस आवृत्तीवर काही प्रारंभिक आराखडे आहेत.’’
ती म्हणाली, ‘‘बेबी हे एअर लाँच व्हर्जन ना? सुखोई ३० वर लागेल ना? आपण आधीपण यावर चर्चा केलीय.’’ त्याला डॉ. कुरुलकर याने हो, असे उत्तर दिले असून, पुढे त्याने ‘आमच्याकडे आता सर्व चार व्हर्जन आहेत,’ अशी माहिती दिली. हे संभाषण आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याचे.
डॉ. कुरुलकर याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिला अत्यंत गोपनीय माहिती प्रत्यक्षात दाखविण्याची तयारी दर्शवली होती, असे त्याच्या व्हॉट्स‍ॲप चॅटिंगमधून स्पष्ट झाले आहे. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणात न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून हे चॅटिंग समोर आले आहे.
‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या अग्नी ६, मिसाइल लाँचर, एमबीडीए, ब्रह्मोस आदी क्षेपणास्त्रांसह रुस्तुम, सरफेस टू एअर मिसाइल (एसएएम), इंडियन निकुंज पराशर या प्रकल्पांची आणि ‘डीआरडीओ’च्या कामांची माहिती डॉ. कुरुलकर याने झारा हिला सोशल मीडिया आणि ई-मेलद्वारे पुरविल्याचे एटीएस तपासात निष्पन्न झाले आहे. काही फोटो व माहिती नष्ट (डिलीट) केली आहे. जून २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान वेळोवेळी केलेले चॅटिंग एटीएसने न्यायालयात दोषारोपपत्राच्या माध्यमातून सादर केले आहे.

माझा नंबर ब्लॉक का केला?
झाराने ती यूकेमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याची ओळख डॉ. कुरुलकरला सांगितली होती. त्यानंतर अश्लील संदेश आणि व्हिडिओ पाठवून त्याच्याशी मैत्री केली. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये डॉ. कुरुलकर याने झाराचा मोबाइल क्रमांक ब्लॉक केला होता. तिने माझा मोबाईल क्रमांक ब्लॉक का केला? असा प्रश्न अनोळखी क्रमांकावरून डॉ. कुरुलकर याला विचारला, असे आरोपपत्रात नमूद आहे.

डॉ. कुरुलकरने चॅटिंगद्वारे झाराला काय माहिती दिली
- एसएएमची टेस्ट झाली व ती हवार्इ व सैन्य दलाला देणार
- ड्रोनद्वारे घेण्यात आलेले फोटो पाठवले
- ड्रोनच्या टेस्टिंगचे व्हिडीओ पाठवले
- कोणत्या देशांनी एके सिस्टम मागवली
- फिलिपीनने ब्रह्मोसच्या ऑर्डरमध्ये वाढ केली
- अग्नी - ६ मी डिझाइन केले आहे

अग्नी-६ बाबत झालेले चॅटिंग
झारा : अग्नी-६ चे काम कसे सुरू आहे, त्याची टेस्ट कधी होणार?
डॉ. कुरुलकर : नाइट फायर करणार, थोडा धीर धर
झारा : अग्नी-६ कुठे जाणार सैन्य की हवार्इदल?
डॉ. कुरुलकर : दोन्हीकडे


बेब, तू इथे आलीस की दाखवतो
झारा : ब्रह्मोससाठी किती व्हर्जन केली गेली?
डॉ. कुरुलकर : मला वाटते खूप आहेत. बरीचशी उपकरणे माझ्या आस्थापनेत असतील.
झारा : बेब, डिझाइन रिपोर्ट म्हणजे तुझ्या मते कसा असेल?
डॉ. कुरुलकर : बेब, याची तुला कॉपी व्हॉट्‍सॲप किंवा मेल करू शकत नाही. हे खूप संवेदनशील आहे. मी ती मिळवितो आणि तयार ठेवतो. तू इथे आल्यावर ती दाखवतो.

PNE23T54467

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

SCROLL FOR NEXT