पुणे

जादूटोणा, धार्मिक विधीच्या बहाण्याने उकळले लाखो रुपये

CD

पुणे, ता. १० : घरातील आर्थिक अडचण दूर करण्याच्या बहाण्याने जादूटोणा आणि धार्मिक विधीच्या नावाखाली एका कुटुंबीयांकडून २८ लाखांचा ऐवज उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी, अमानुष, अघोरी कृत्य प्रतिबंध आणि जादूटोणा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धानोरी परिसरात मार्च ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. याबाबत धानोरी येथील ३८ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली. त्यावरून अभिषेक कुलकर्णी (वय ३५), विजय जाधव (वय ३०) आणि चालक सदाशिव फोडे (वय ३७, सर्वजण रा. इंदापूर) या तिघा संशयितांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला घरातील अडचणी दूर करण्यासाठी विश्वासात घेत जादूटोणा आणि धार्मिक विधी करावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादीने धार्मिक विधीसाठी आरोपींच्या बॅंक खात्यात २० लाख ३५ हजार रुपये जमा केले. तसेच, आरोपींनी फिर्यादीच्या भावालाही विश्वासात घेत त्यांच्याकडून पावणेआठ लाख रुपये किमतीचे २६ तोळे सोन्याचे दागिने घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking: आजपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही एलपीजी सिलिंडर;ताबडतोब करा 'हे' काम

सायप्रसकडे फक्त पर्यटनस्थळ म्हणून पाहू नका; भारतीय व्यवसायांसाठी मोठी संधी, विराज कुलकर्णींचा दावा

Hockey World Cup : पाकिस्तानचा मुर्खपणा, महत्त्वाचे सामान न घेताच खेळायला आले; रेफरीने बरोबर धारेवर धरले; माजी कर्णधार म्हणाला...

आईने इस्लाम स्वीकारला आणि आम्हालाही... शर्मिला टागोर यांची लेक सबा पतौडीचा खुलासा; म्हणाली - आम्ही कधीही मंदीरात...

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळले घरात, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

SCROLL FOR NEXT