पुणे

पुणे महापालिकेकडून लोहगावच्या पर्यायी रस्त्याचा आराखडा पूर्ण

CD

पुणे, ता. ११ : लोहगाव विमानतळ धावपट्टी वाढविण्यापूर्वी लोहगावला ये-जा करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या पर्यायी रस्त्याचा आराखडा तयार करण्याचे काम पुणे महापालिकेने पूर्ण केले आहे. या आराखड्यास संरक्षण मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी १२ कोटी रुपयांचा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.
पुण्यातून आंतररराष्ट्रीय विमानसेवेला प्राधान्य मिळावे, यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून लोहगाव विमानतळाच्या धावपट्टी वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यादृष्टीने हवाई दलाचे अधिकारी व महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सातत्याने बैठक, प्रत्यक्ष पाहणी देखील झाली आहे. याबरोबरच महापालिकेच्या पथ विभाग, मालमत्ता विभागासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोहगावसाठीच्या पर्यायी रस्त्याचे सर्वेक्षण करून त्याचा आराखडा तयार केला आहे. महापालिकेकडून रस्त्याचा आराखडा व त्यासंबंधीचा अहवाल संरक्षण मंत्रालयास पाठविला जाणार आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरु केले जाणार आहे.

विमानतळाच्या धावपट्टीची वाढ करण्यापूर्वी लोहगावला जाणारा पर्यायी रस्ता तयार करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने रस्त्याचा आराखडा महापालिकेने केला आहे. संबंधित आराखडा व अहवाल संरक्षण मंत्रालयात पाठविला जाईल, त्यास मंजुरी मिळाल्यानंतर रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण केले जाईल. हवाई दलाकडून धावपट्टीवाढीसाठी ३१० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे, तर लोहगाव पर्यायी रस्त्यासाठी महापालिका १२ कोटी रुपये खर्च करणार आहेत.
-विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT