पुणे

मोकाच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना बंगळूर, नगरमधून अटक

CD

पुणे, ता. ११ : संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पथकाने बंगळूरमधून, तर अन्य एकाला अहमदनगरमधून अटक केली. या आरोपींवर वाहनांची तोडफोड करण्यासह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
अजय चंद्रकांत विटकर (वय २२), ऋषिकेश ऊर्फ बबल्या सुनील देवकुळे (वय १९) आणि अनिकेत ऊर्फ डॅनी शंकर मंगळवेढेकर (वय २२, तिघे रा. वडारवाडी, गोखलेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
चतु:शृंगी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या मोकाच्या गुन्ह्यातील तिघे सराईत गुन्हेगार फरार होते. त्यापैकी विटकर आणि देवकुळे हे बंगळूर शहरात लपून राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेतील युनिट चारच्या पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने त्यांना बंगळूरमधून ताब्यात घेतले. तसेच, अनिकेत मंगळवेढेकर हा अहमदनगर एमआयडीसी परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार युनिट चारच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lucknow Fire: ''वाचवा..वाचवा...!''छताचा दरवाजा लॉक अन् निष्पाप मुलं जिवाच्या आकांताने ओरडत होते; लखनऊ जळीतकांडाचा थरारक अनुभव

रात्रीची वेळ, एसटी बसमध्ये अंधार; कंडक्टरचं महिलेशी गैरवर्तन, वाशिम-छत्रपती संभाजीनगर बसमधील प्रकार...

Umarga News : माजी मंत्री बसवराज पाटील यांची राजकारणात पुन्हा 'दमदार एन्ट्री'

IPL 2027 Trade! हार्दिक जाणार, सुर्याही जाणार.. मग Mumbai Indians चे नेतृत्व कोण करणार? जसप्रीत नाही, रोहितचा लाडका होणार कॅप्टन

Latest Marathi News Live Update: नागपूरमध्ये टॅक्सीची तोडफोड

SCROLL FOR NEXT