पुणे

पावसाने उघडीप दिल्याने टँकरच्या संख्येत पुन्हा वाढ

CD

पुणे, ता. ११ : पावसाने उघडीप दिल्याने ३२ टँकरऐवजी आता ३५ टँकरद्वारे जिल्ह्यात पाणीपुरवठा करावा लागत आहे. मागील आठवड्यापर्यंत ही संख्या ४४ होती. पावसाच्या आगमनानंतर टँकरची संख्या १२ ने कमी झाली होती. त्यामुळे ३२ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. त्यामध्ये आता नव्याने तीन टँकरची भर पडली आहे.

कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये ७८ हजार २०९ नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा बसत होत्या. जून महिना पूर्णता: कोरडा गेल्याने पाणी टंचाईच्या झळा ग्रामीण भागातून शहरवासीयांना बसण्यास सुरुवात झाली होती. मात्र, जुलै महिन्यात मान्सूनचे आगमन होत सुरुवातीचे आठ ते दहा दिवस पावसाची रिपरीप कायम राहिल्याने टंचाईच्या झळा कमी झाल्या. त्यातच ६ जुलैपासून जिल्हा प्रशासनाकडून ४४ टँकरपैकी १२ टँकर कमी करत ३२ टँकर सुरू ठेवण्यात आले. मात्र, ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली असून काही ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावली आहे. त्यामुळे पुन्हा टॅंकरच्या संख्येत तीनने वाढ करीत ३५ टँकर सुरू करण्यात आले आहे. पुरंदर तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा कमी झाल्या म्हणून ६ टँकरपैकी ३ टँकर कमी करण्यात आले होते. मात्र, पावसाचा जोर ओसरल्याने पुन्हा ६ टँकर सुरू करण्यात आले आहे.

तालुका - टँकर - गावे
आंबेगाव - १२ - १७
जुन्नर - ०६ - ०७
खेड - ११ - १७
पुरंदर - ०६ - ०६
एकूण - ३५ - ४७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

iPhone 18 Pro साठी पहाटेपासून ग्राहकांच्या लांब रांगा; कुठे मिळतो? किती EMI भरावा लागणार? जाणून घ्या

Marathi News Live Updates : आमच्या विरोधात कटकारस्थान, या मागे नेपाळी कनेक्शन; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

Goat Farming Subsidy: शेळीपालनासाठी ६.८४ लाखांचे अनुदान; १०० शेळ्या, ५ बोकडांचा फार्म उभारण्याची संधी, कसा करायचा अर्ज?

SCROLL FOR NEXT