पुणे

माजी नगरसेवक पानसरेंच्या खूनप्रकरणी आणखी एकाला अटक

CD

पुणे, ता. ११ : जमिनीच्या वादातून जेजुरी (ता. पुरंदर) येथील माजी नगरसेवक मेहबूब सय्यदलाल पानसरे यांच्या खून प्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे.
दत्ता मारुती मळेकर (वय ४५, रा. गुरुवार पेठ, महाराणा प्रताप रस्ता, पुणे) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहबूब पानसरे यांच्यावर सात जुलै रोजी हत्याराने वार करून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी वनेश परदेशी आणि महादेव गुरव ऊर्फ काका परदेशी या दोघांना पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. दरम्यान, दत्ता मळेकर हा वाघोली येथील गायरान परिसरात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांना मिळाली. त्यावरून पथकाने सापळा रचून मळेकरला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drought: पावसाअभावी भातपिके वाळू लागली; मुळशी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक

Traditional Farming: ट्रॅक्टरच्या युगातही बैलजोडीचा ध्यास; २२ वर्षांच्या ‘राजा’नंतर खंडेराव बकाल यांनी पुन्हा जपला शेतीचा पारंपरिक वारसा

रस्त्याच्या दर्जावरून लोकांनी प्रश्न विचारले, व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मंत्र्यांने कानशिलात लगावली; VIDEO VIRAL

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गुप्त बैठक; सुजय विखेंचा थोरातांना वाकून नमस्कार चर्चेत

रिपोर्टवर ‘नॉर्मल’ लिहिलंय म्हणून खुश होऊ नका! हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलची आकडेवारी समजून घ्या!

SCROLL FOR NEXT