पुणे

राज्य औषध व्यवसाय परिषदेवर जगन्नाथ शिंदे

CD

राज्य औषध परिषदेवर
पाच जणांची नियुक्ती

पुणे, ता. १६ : अखिल भारतीय औषध विक्रेता संघाचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे आणि केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सचिव अनिल बेलकर यांच्यासह पाच जणांची नियुक्ती राज्य औषध व्यवसाय परिषदेवर करण्यात आली. त्याबाबतचा आदेश राज्य सरकारने जारी केला. राज्य परिषदेच्या जून २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत राज्यभरातील फार्मासिस्टमधून पाच सदस्यांची निवड करण्यात आली. फार्मसी कायदा १९४८ च्या तरतुदीनुसार नामनिर्देशित सदस्यांमधून शिंदे, बेलकर यांच्याशिवाय प्रवीण पाटील, दीपक कोठारी व धनंजय जोशी यांची नेमणूक झाली. गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या या नेमणुकीमुळे परिषदेच्या पदाधिकारी निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर हा प्रश्न प्रलंबित होता. राज्यातील फार्मसी पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन नोंदणी केलेल्या फार्मासिस्टच्या नोंदी ठेवणे, देखरेखीचे काम करणे तसेच वेळोवेळी ज्ञान व कौशल्य विकास, नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याचे काम ही परिषद करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : 1,52,85,09,99,296.. राजस्थान रॉयल्सचा सौदा झाला! अमेरिकेतील उद्योजकाने खरेदी केला संघ, IPL मधील सर्वात मोठी डिल

Soft Skills: कॉर्पोरेट विश्वात केवळ 'डिग्री'ला महत्त्व नाही; मॅनेजमेंट विद्यार्थ्यांकडे 'सॉफ्ट स्किल्स' असणे आता अनिवार्य

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरण: आज 3.30 वाजता महत्त्वाची सुनावणी

सेम टू सेम! चाकणकर आणि तटकरेंच्या बोटाची दुखापत अन् कारणही एकच; किती मोठा हा योगायोग? अंधारेंचा सवाल

IPL 2026 Marathi News: रवींद्र जडेजाचा 'तो' फोटो, साक्षीची Video शूटींग अन् MS Dhoni फक्त रडायचाच बाकी होता, Viral Moment

SCROLL FOR NEXT