पुणे

पुण्याला २१ टीएमसी पाणी द्या

CD

पुण्याला हवे २१ टीएमसी पाणी
विधानसभेत आमदारांकडून मागणी

पुणे, ता. १८ ः पुणे महापालिकेने जलसंपदा विभागाकडे २०२३-२४ वर्षासाठी पाण्याचे अंदाजपत्रक सादर करताना २०.९० टीएमसी पाण्याच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. याबाबत आज विधानसभेत पुण्यासाठी २१ टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात आमदार रवींद्र धंगेकर यांनी तारांकित प्रश्‍न विचारला होता. त्यावर समाविष्ट ३४ गावांतील पाणी टंचाईसह शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत त्यांच्यासह भीमराव तापकीर, संग्राम थोपटे, संजय जगताप, सुनील टिंगरे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला.
‘नव्याने समाविष्ट गावांत अस्वच्छ पाणी पुरवठा होत आहे. शहरातील समान पाणी पुरवठा योजनेचे काम अर्धवट आहे,‘ असे धंगेकर म्हणाले. ही योजना लवकर पूर्ण करून टँकर माफियांवर नियंत्रण आणणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुणे शहराची लोकसंख्या वाढल्याने २१ टीएमसी पाणी कोटा मंजूर करणार का, अशा प्रश्नासह त्यांनी मुद्दा लावून धरला.
त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. समाविष्ट ३४ गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने डीपीआर (सविस्तर प्रकल्प आराखडा) तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरच होईल, असे त्यांनी सांगितले.

वेळ अपुरा
प्रश्‍नोत्तरासाठी एका तासाच वेळ असतो. आज पुण्याच्या पाणी पुरवठ्यासंदर्भातील प्रश्न पाचवा होता. धंगेकर यांच्या प्रश्‍नावर सामंत यांनी उत्तर दिल्यानंतर प्रश्‍नोत्तराचा तास संपत आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तसे जाहीर केले. त्यामुळे पुण्याच्या पाणी पुरवठ्यावर पुढील आणखी चर्चा होऊ शकली नाही.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Leaders Join Congress : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! १०० हून अधिक नेते-कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला; यावेळी भाजप नाही तर कॉंग्रेसमध्ये प्रवेश

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

आरोग्य‘चेतना’ : स्पायनल ट्युमरची अत्याधुनिक शस्त्रक्रिया

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

SCROLL FOR NEXT