पुणे

शाळा, महाविद्यालयांत आता ‘युवा पर्यटन मंडळ’

CD

पुणे, ता. १८ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि इयत्ता सातवीपासून पुढील वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘युवा पर्यटन मंडळा’ची (युथ टुरिझम क्लब) स्थापना करण्यात येणार असल्याचे राज्य पर्यटन विभागाने स्पष्ट केले आहे.

शाळा, महाविद्यालयांमध्ये युवा पर्यटन मंडळ स्थापन करण्याची सूचना पर्यटन विभागाने शालेय शिक्षण आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाला केली असून यासंदर्भातील अध्यादेश पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांनी काढला आहे. देशातील पर्यटन, समृद्ध वारसा व संस्कृती यांचे माहिती देणारे म्हणून जागतिक स्तरावर देशाला प्रसिद्ध करतील, असे भारतीय पर्यटनाचे युवा राजदूत घडविणे असा युवा पर्यटन मंडळांची स्थापना करण्यामागील उद्देश आहे. यातून विद्यार्थी आणि तरुणांमध्ये संघ भावना, व्यवस्थापन नेतृत्व आणि सेवा यासारखी कौशल्ये आत्मसात करण्याची वृत्ती विकसित होईल. तसेच शाश्वत आणि जबाबदार पर्यटनाची जाणीव, जागृती होण्यास मदत होणार आहे.

युवा पर्यटन मंडळासाठी मिळणार निधी
- २०२३-२४ या वर्षाकरिता निधीचे वाटप होणार
- शाळांमध्ये प्रत्येकी एका क्लबसाठी दहा हजार रुपये मिळणार
- महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी एका क्लबसाठी २५ हजार रुपये मिळणार
- एकूण तरतूद २५ कोटी रुपये
- पर्यटन संचालनालयाकडे प्रस्ताव सादर करणाऱ्या शाळा/महाविद्यालयांना मिळणार निधी
- ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ तत्त्वावर निधीचे वाटप

पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीसाठी कागदपत्रे
- सर्व विद्यार्थी सदस्यांचे आधार क्रमांक
- शिक्षक व विद्यार्थी समन्वयकांचे आधार क्रमांक
- प्रस्ताव मुख्याध्यापक/प्राचार्यांच्या स्वाक्षरीने पाठविणे आवश्यक
- क्लब स्थापनेनंतर पर्यटन स्थळांना भेटी देण्याबाबत छायाचित्रांसह अहवाल प्राचार्यांच्या स्वाक्षरीने सादर करणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT