पुणे

अंमली पदार्थांची तस्करी, विक्री रोखण्यासाठी उपाय करा!

CD

पुणे, ता. १८ ः अंमली पदार्थांचा वापर पुणे शहरातील उच्चभ्रु परिसरातील पब, हॉटेलमध्ये असून आता त्यांच्या विक्रीमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे तरुणाचे भविष्य अंधकारमय होत असून सरकार अंमली पदार्थ तस्करी व विक्री रोखण्यासाठी नेमकी काय उपाययोजना करणार आहे? असा प्रश्‍न आमदार रोहित पवार यांच्यासह अन्य आमदारांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला.

आमदार रोहित पवार, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे यांनी पुण्यातील अंमली पदार्थ तस्करी व विक्रीच्या वाढत्या समस्येबाबत अधिवेशनामध्ये प्रश्‍न उपस्थित केला. शहरामध्ये जानेवारी ते मे २०२३ दरम्यान तब्बल सात कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. याबरोबरच अन्य अंमली पदार्थांचीही सर्रास विक्री केली जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला. शहरातील कोरेगाव पार्क, मुंढवा, बाणेर, हिंजवडी येथील उच्चभ्रू परिसरातील पब, हॉटेलमध्ये ग्राहकांना सर्रास अंमली पदार्थ विक्री केली जात असल्याचा उल्लेखही पवार यांनी केला आहे. त्यामुळे शासन अंमली पदार्थ तस्करी व विक्री रोखण्यामध्ये नेमकी काय उपाययोजना करणार आहे, असा प्रश्‍न विचारण्यात आला आहे.

विक्रीसाठी कोडवर्ड
शहरात अंमली पदार्थ पोहोचविण्यासाठी थेट ‘ॲप’चा वापर होत आहे. ग्राहक व विक्रेता यांच्यावर पोलिस कारवाई होऊ नये, यासाठी खास ‘कोडवर्ड’द्वारे संवाद साधला जात आहे. विशिष्ट अंमली पदार्थासाठी विशिष्ट इमोजीचा वापर केला जात आहे, असेही उपस्थित प्रश्‍नामध्ये त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ohh No! भारतीय गोलंदाज जखमी, स्ट्रेचरवरून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; असं नेमके काय घडले?

मनीष मल्होत्रांच्या रॅम्पवर सेलिब्रिटींचा जलवा! सगळीकडे आलियाच्या साडीची चर्चा, लूक पाहून चाहते घायाळ

Ashutosh Ranka Detained : कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका यांच्यासह अनेकांना आसाममध्ये घेतलं ताब्यात

Pregnant Dancer Murder: २७५ किमी दूर नेऊन गरोदर नृत्यांगनेचा खून; सीसीटीव्ही, तांत्रिक तपासातून कळंबच्या चौघांसह पाच जण अटकेत, दोघे फरार

SCROLL FOR NEXT