Sharad Pawar PM Narendra Modi Sakal
पुणे

PM Modi-Sharad Pawar : आठ वर्षांनी मोदी- पवार पुण्यात एकाच व्यासपीठावर

पंतप्रधान मोदी-शरद पवार एकाच मंचावर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मंगळवारी (ता. १) एकाच व्यासपीठावर येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवारही त्यावेळी उपस्थित असतील.

गेल्या सुमारे दोन महिन्यांतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यातील प्रमुख नेते जाहीर कार्यक्रमात प्रथमच एका व्यासपीठावर येतील. त्यामुळे या सोहळ्याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्या कार्यक्रमासाठी शरद पवार प्रमुख पाहुणे असतील. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी (ता. १) सकाळी साडेअकरा वाजता हा कार्यक्रम होईल.

मोदी आणि शरद पवार याआधी १४ फेब्रुवारी २०१५ रोजी बारामतीमधील कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यावेळी अप्पासाहेब पवार सभागृहाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्त झाले होते. त्यानंतर असा योग येत आहे.

दिल्ली सरकारच्या अधिकारांबाबत केंद्र सरकारच्या विधेयकावर मंगळवारी (ता. १) राज्यसभेत चर्चा होणार असून त्यावर मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या उपस्थितिविषयी अनिश्चितता होती. मात्र पवार यांच्या कार्यालयातून ते उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच टिळक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी त्यास दुजोरा दिला.

या दौऱ्याच्या निमित्ताने वातावरण निर्मितीसाठी शहर भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी त्यासाठी कार्यरत आहेत.

मोदी यांच्या दौऱ्याचे स्वरूप
- एक ऑगस्ट रोजी सकाळी ११ ः श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन
- सकाळी ११. ३० वाजता ः लोकमान्य टिळक पुरस्कार ः स. प. महाविद्यालय (कार्यक्रम निमंत्रितांसाठी)
- दुपारी १२.४५ वाजता ः मेट्रोच्या दोन विस्तारित मार्गांचे लोकार्पण, पंतप्रधान आवास योजनेतील पुणे आणि पिंपरीतील चार हजार सदनिकांचे लोकार्पण, पीएमआरडीएच्या सहा हजार घरांचे भूमिपूजन (खुला कार्यक्रम)
- दुपारी २. ३० वाजता ः दिल्लीकडे प्रस्थान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! २९ आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणांत मोठी कपात; एअर इंडियाचा मोठा निर्णय, जाणून घ्या यादी...

Fuel Crisis: मोदी बोलले, एकनाथ शिंदेंनी अस्तित्वात आणले, सरकारी ताफ्यातील वाहनं कमी करून दुसऱ्यांसाठी उदाहरण ठरले

MSP hike 2026: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक! १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ, कापूस-सूर्यफूल उत्पादकांना मोठा फायदा!

IPL 2026 : चेन्नईच्या ताफ्यात दाखल झालेला Macneil Hadley Noronha कोण? UAEत बालपण; DC, KKR, MI साठी दिलेलं ट्रायल...

Mumbai: मुंबईकरांच्या स्वयंपाकघरावर महागाईचा तडाखा! भाजीपाल्याचे भाव वाढले; जाणून घ्या सध्याचे दर...

SCROLL FOR NEXT