पुणे

अवती भवती

CD

‘फिजिक्स’मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान
पुणे, ता. ३१ : इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स (आयओपी)च्यावतीने रौप्य महोत्सवी वर्षारंभानिमित्त फिजिक्स या विषयात उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डीआरडीओची माजी संचालक डॉ. एम. आर. पाटकर, आमदार सत्यजित तांबे, प्रमोद जाधव, नंदकुमार जाधव आदी उपस्थित होते. ‘‘आजच्या युवापिढीने कष्टासोबत स्मार्ट वर्क ही केले पाहिजे. जरासा अवघड, समजायला किचकट फिजिक्स विषय शिकवणं नक्कीच आव्हानात्मक काम आहे,’’असे मत सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.


वाल्हेकर दत्त मंदिरात श्रीमद् भागवत कथा सप्ताह
पुणे, ता. ३१ : श्रावण अधिक महिन्यानिमित्ताने वारजे येथील श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्टतर्फे बुधवार (ता. २)ते ८ ऑगस्ट दरम्यान सायंकाळी ५ ते ७ या वेळेत वाल्हेकर दत्त मंदिरात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहात रामनाथ महाराज अय्यर भागवत कथा सांगणार आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष संजय वाल्हेकर यांनी केले.

पुणेकरांच्या वतीने पालकमंत्र्यांचे अभिनंदन
पुणे, ता. ३१ : शहरात पाणी कपात रद्द करण्यासाठी दर गुरुवारचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात नुकताच आढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निर्णय घेतला आहे. त्याबद्दल जनता दल (सेक्युलर)चे सदस्य अशोक गायकवाड यांच्यातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे पालकमंत्र्यांचे पुणेकरांच्या वतीने अभिनंदन केले. या बैठकीत महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता प्रसन्न जोशी, कार्यकारी अभियंता श्वेता कुन्हाडे, महापालिकेचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT