पुणे

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक पुणे केंद्राच्या वतीने शिक्षक पुरस्कार आणि विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य

CD

पुणे, ता. ३१ : ‘‘विद्यार्थ्यांच्या ऊर्जेचे चांगल्या गोष्टींत रूपांतर करण्याचे काम शिक्षक करतात. कृत्रिम बुद्धीमत्ता आली तरीही शिक्षकांचे महत्त्व कमी होणार नाही. शिकवताना शिक्षकांमध्ये असणारी तळमळ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून येणार नाही,’’ असे मत माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक पुणे केंद्राच्या वतीने शिक्षक पुरस्कार आणि विद्यार्थी आर्थिक साहाय्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रप्रमुख मकरंद माणकीकर, कार्यवाह विश्वनाथ भालेराव, मध्यवर्ती सदस्य अनिल शिदोरे, संयोगिता पागे, शैक्षणिक प्रमुख राजेंद्र देवधर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात भाग्यश्री हर्षे, यशवंत हरिभक्त, लीना भुस्कुटे, हेमंत पाठक या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. संस्कृत आणि मराठी विषयात पीएच.डी., पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. मकरंद माणकीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमोद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather forecas : महाराष्ट्रात थंडीचा जोर आणखी वाढणार, कोकणपासून विदर्भापर्यंत आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

Chia Pudding Recipe: नो शुगर, नो गिल्ट! ब्रेकफास्टला बनवा टेस्टी अन् तितकाच हेल्दी 'तिरामिसू चिया पुडिंग'; पाहा भन्नाट रेसिपी...

आजचे राशिभविष्य - १२ नोव्हेंबर २०२६

आजचे पंचांग आणि दिनविशेष - १२ नोव्हेंबर २०२६

Abhishek Sharma: "ओह माय गॉड, अभिषेक!" स्टार क्रिकेटपटूची शाळेतल्या शिक्षिकेला दिवाळीत सरप्राईज भेट; Viral Video

SCROLL FOR NEXT