पुणे

परुषोत्तम करंडक

CD

लोगो
61423
---
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ
प्राथमिक फेरीची एक हजार रुपयांची तिकिटे संपली

पुणे, ता. १४ : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित ५८ व्या आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला बुधवारपासून (ता. १६) प्रारंभ होत आहे. या वर्षीपासून सुरू झालेल्या ऑनलाइन तिकीट विक्रीला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून एक हजार रुपयांची तिकिटे संपली आहेत.
भरत नाट्य मंदिरात ३० ऑगस्टपर्यंत स्पर्धा चालेल. रोज सायंकाळी ५ वाजता नाट्यकलाकृतींना सुरवात होईल. दोन्ही रविवारी (२०, २७) दोन सत्र असतील. सकाळी नऊ आणि सायंकाळी पाच अशी प्रारंभाची वेळ असेल. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी नऊ संघांची निवड होईल. अंतिम फेरी ९ आणि १० सप्टेंबर रोजी होईल.
या स्पर्धेला विद्यार्थ्यांबरोबरच प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद मिळतो. तिकिटे मिळत नसल्यामुळे प्रेक्षकांची गैरसोय होत होती. ही अडचण लक्षात घेऊन संयोजकांनी यंदापासून ऑनलाइन तिकीट विक्रीचा निर्णय घेतला. त्यासाठी नाट्यगृहातील काही जागाही राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पहिल्याचवर्षी पुणेकर रसिकांनी आपली आसने आरक्षित केली. केवळ एक हजार रुपयांमध्ये प्रेक्षकांना तब्बल ५१ एकांकिका बघता येतील. सध्या बाल्कनीची पाचशे रुपयांची तिकीट विक्री ऑनलाइन सुरू आहे.
---
४२ संघांच्या नाट्यसंहिता नव्या
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच्या या स्पर्धेत ५१ संघांनी भाग घेतला आहे. यातील ४२ संघांच्या नाट्यसंहिता नव्या आहेत. मराठवाडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‌‘चिकन खर्डा विथ गार्लिक नान’ या एकांकिकेने प्राथमिक फेरीचा पडदा उघडेल. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालच्या ‌‘सुरेल चाललंय आमचं'' या एकांकिकेने या फेरीचा समारोप होईल.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates Live: लाडक्या बहिणींना सरकारकडून रक्षाबंधनाची खास भेट

Mumbai Crime: माजी नगरसेवक कमलेश राय यांना खंडणी प्रकरणात अटक!

IND vs ENG 5th Test: मोहम्मद सिराज मॅजिक! Joe Root ची सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी अन् मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

Trending News : आई म्हातारी झाली पण मुलगा माणूस झाला नाही! कोर्टात गाजली करूण कहाणी; न्यायाधीश म्हणाले, मला लाज वाटते...

71st National Award: 'नाळ', 'आत्मपॅम्फ्लेट'ची राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर; तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला... दिग्दर्शकाचा आनंद गगनात मावेना

SCROLL FOR NEXT