Shravan 2023 sakal
पुणे

Shravan 2023 : श्रावण महिन्यास आजपासून प्रारंभ; जाणून घ्या महत्वाचे सण आणि महत्त्व

मंदिरांमध्येही या पवित्र महिन्याच्या स्वागतासाठी तयारी सुरु

सकाळ वृत्तसेवा

पुणे : धार्मिक अनुष्ठान, व्रतवैकल्य करण्यासाठी महत्त्वाचा अन् सणांची रेलचेल असणारा नीज श्रावण महिना आजपासून (ता. १७) सुरू होत आहे. मंदिरांमध्येही या पवित्र महिन्याच्या स्वागतासाठी तयारी सुरु आहे.

हिंदू पंचांगानुसार तीन वर्षांनी अधिक मास येतो. यंदा अधिक श्रावण मास आल्यामुळे नीज श्रावण मास सुरू होण्यास एक महिन्याचा उशीर झाला आहे. यंदा श्रावण महिना १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत असणार आहे.

यामध्ये २१ ऑगस्ट, २८ ऑगस्ट, ४ सप्टेंबर आणि ११ सप्टेंबर असे चार श्रावण सोमवार आहेत. श्रावणातील पहिल्याच सोमवारी म्हणजे २१ तारखेला नागपंचमीचा सण आला आहे. ३० ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आहे. सहा आणि सात सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला असे दोन सण आहेत.

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा असणार पोळा हा सण १४ तारखेला साजरा केला जाणार आहे. श्रावण मासातील सोमवारी शहरातील महादेव मंदिरामध्ये भाविक दर्शनासाठी गर्दी करतात, त्यादृष्टीनेही तयारी केली जात आहे. तसेच दहीहंडीसाठी मंडळांची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, १६ सप्टेंबर रोजी भाद्रपद महिना प्रारंभ होणार आहे.

नागपंचमी हा सण पहिल्याच सोमवारी आला आहे. श्रावण महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असणार आहे. अधिक मासामुळे गेले महिनाभर अनेक मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सण आणि उत्सवांमुळे अर्थचक्रालाही चालना मिळाली आहे.
- मोहन दाते, पंचांगकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGCAला उशिरा जाग, व्हीआयपींना सेवा देणाऱ्या देशातील १४ विमान कंपन्यांचं ऑडिट; यादी आली समोर

Chhatrapati Sambhajinagar Accident : सिल्लोड तालुक्यात भीषण अपघात; उभ्या ट्रकला दुचाकीची जोराची धडक, बिअरबारवर काम करणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update : मंत्रालयात लक्ष्मीदर्शन, झिरवाळ राजीनामा द्या; विरोधकांचं विधानभवनाबाहेर आंदोलन

Hapus Mango Price : कोल्हापूर, सांगली मार्केटला हापूस आंबा दाखल, ६०० रुपयांना एक आंबा; हंगामात उच्चांकी भाव

हनुमंत पवार मारहाण प्रकरणी तुषार दामगुडेंसह तिघांवर गुन्हा दाखल, पिस्तुल जप्त करून घरी सोडलं; अटक का नाही? कारण समोर

SCROLL FOR NEXT